Foreign-students 
पुणे

Coronavirus: परदेशी विद्यार्थ्यांत जनजागृती; "कोरोना'च्या पार्श्‍वभूमीवर पुणे विद्यापीठ सतर्क 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे विद्यापीठात आणि संलग्न महाविद्यालयांत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये "कोरोना'बाबत जनजागृती केली जात आहे. शिवाय महाविद्यालयांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. "कोरोना'ने जगभरात थैमान घालण्यास सुरुवात केली असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने खबरदारीचे पाऊल उचलले आहे. 

भारतात "कोरोना'च्या प्रसारावर प्रतिबंधासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असताना परदेशी विद्यार्थ्यांचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यातही त्यांच्या सुरक्षेसाठी विद्यापीठाने तयारी सुरू केली आहे. विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राच्या प्रवेशद्वारावर काय करावे, काय टाळावे याचे माहिती पत्रक लावले असून, गेटवर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर ठेवले आहे. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना "कोरोना'ची माहिती देण्यात आली असून, परदेशातून आलेल्या कोणत्याही व्यक्तीशी भेटायला गेल्यानंतर हस्तांदोलन, गळाभेट टाळाच, याची विशेष सूचना देण्यात आली. शिवाय भारतातील स्थिती सामान्य असल्याचेही त्यांच्या पालकांना कळविल्याचे आंतरराष्ट्रीय केंद्राचे प्रमुख डॉ. विजय खरे यांनी सांगितले. 

...तर नवीन प्रवेशास मुदतवाढ 
सध्या पुण्यात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची मार्च-एप्रिलमध्ये परीक्षा असल्याने ते स्वदेशात जाणार नाहीत; तर नवीन वर्षाची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन असल्याने ती पूर्ण होऊन, जूनच्या दुसऱ्या आठवड्यानंतर नवे विद्यार्थी पुण्यात येतील. तोपर्यंत "कोरोना'चा प्रभाव कमी झाला नाही, तर प्रवेशास मुदतवाढ दिली जाईल, असे खरे यांनी सांगितले 

पुण्यात शिकणारे परदेशी विद्यार्थी : 5000 
पुणे विद्यापीठातील परदेशातील विद्यार्थी : 150 
2019-20 मध्ये प्रवेश झालेले विद्यार्थी : 569 
मुले : 338 
मुली : 231 

 

विद्यार्थ्यांना दिलेल्या सूचना 
- वारंवार हात स्वच्छ धुवा 
- अस्वच्छ हात चेहऱ्याला लावू नका 
- संवाद साधताना व्यक्तीपासून अंतर ठेवा 
- आजारी असल्यास त्वरित विद्यापीठाच्या आरोग्य केंद्रात तपासणी करा 
- मास्क वापरा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT