घोडेगाव पोलीस ठाण्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती sakal
पुणे

घोडेगाव पोलीस ठाण्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती

चंद्रकांत घोडेकर ः सकाळ वृत्तसेवा

घोडेगाव : शेजारी राहणाऱ्यांना घरावर लक्ष ठेवण्यास सांगा, मौल्यवान वस्तु, पैसे घरात ठेवू नका,ते बॅंक लॉकरमध्ये ठेवा , गर्दीच्या ठिकाणी, परिसरात संशयित व्यक्ति आढळल्यास पोलीस ठाण्यास त्वरीत कळवावे. घर, सोयायटी, दुकान, कंपनी येथे सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. असे आवाहन घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले.

घोडेगाव ( ता आंबेगाव ) येथील एसटी बसस्थानक, जनता विदया मंदिर येथे उपस्थित असलेल्या महिला, विदयार्थीनी, नागरिक यांच्याबरोबर माने यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

महिला अथवा मुलीस कोणताही व्यक्ति छेडछाड, धमकावणे, रस्ता अडवून बोलणे, छुपा पाठलाग करणे, कौटुंबिक हिंसाचाराबाबत त्रास देत असेल किंवा संशय असेल तर निर्भयपणे घोडेगाव पोलीस स्टेशन किंवा पुणे ग्रामीण डायल नंबर ११२ वर संपर्क साधावा असे आवाहन घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी केले.

यावेळी घोडेगाव पोलीस ठाण्याचे वतीने जनजागृती पत्रके गाडयांवर लावण्यात आली. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, संपत कायगुडे, जालींदर रहाणे, महिला पोलीस कर्मचारी मंगल शिंदे, सोनाली रघतवान, नामदेव ढेंगळे, स्वप्निल कानडे, अॅड. गायत्री काळे, रत्ना गाडे, अर्चना गुळवे आदि उपस्थित होते.

माने म्हणाले, महिला अथवा मुलीस छेडछाड करणार्‍याविरुद्ध कारवाई करण्यात येईल .महिलांनी निर्भयपणे घोडेगाव पोलीस ठाण्यात संपर्क साधावा .परिसरात फिरणारे फेरीवाले, सोने पॉलीस वाले यांच्या आमिशाला बळी पडू नका. गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर, पाकीटमार यांच्यापासून सावध रहावे. खरेदीला जाताना आपले वाहन सुरक्षित ठिकाणी लावावे. बॅंकेच्या संदर्भातील कोणतीही माहिती इतरांना सांगू नका. वयोवृध्द नागरिकांना त्रास होईल असे फटाके वाजवू नका, आतषबाजी, ध्वनीप्रदुषण टाळा आदि सुचना यावेळी सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT