Awareness rally sakal
पुणे

शहरातील भूलतज्ज्ञांची रविवारी जनजागृतीपर प्रभात फेरी

शहरातील भूलतज्ज्ञांची अशा पद्धतीची पहिलीच प्रभात फेरी

इंगोले भागवत

पुणे : पुणे शहरातील सर्व भूलतज्ज्ञ येत्या महाराष्ट्रदिनी (रविवारी) शहरात जनजागृतीपर प्रभात फेरी काढणार आहेत. शहरातील भूलतज्ज्ञांची अशा पद्धतीची ही पहिलीच प्रभात फेरी आहे. भूलतज्ज्ञांच्या इंडियन सोसायटी आॅफ ॲनेस्थेशियालॉजिस्ट या संघटनेच्या (आय.एस. ए.) स्थापनेला यंदा ७५ वर्ष सुरू झाल्याच्या निमित्ताने या संघटनेच्या महाराष्ट्र स्टेट व पुणे शहर शाखेच्यावतीने ही प्रभात फेरी काढण्यात येत आहे. या प्रभात फेरीमध्ये शहरातील भूलतज्ज्ञ सहभागी होणार असल्याचे या संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा भालेराव व सचिव भूलतज्ज्ञ डॉ. सुनीता खेडकर यांनी सांगितले.

येत्या रविवारी सकाळी सात ते आठ या वेळेत ही प्रभातफेरी बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय मार्ग, फर्गसन महाविद्यालय मार्ग, जंगली महाराज रस्ता अशी काढली जाणार आहे. या प्रभात फेरीमध्ये नागरिकांच्या जनजागृतीसाठी जीवनसंजिवनी प्रणालीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. कोणत्याही आजाराची शस्त्रक्रिया करावयाची असेल तर, तेथे भूलतज्ज्ञांचा संबंध येतोच. मात्र नागरिकांमध्ये या पडद्यामागच्या रुग्णसेवेविषयी फारशी माहिती नाही.

अगदी कोरोना संसर्गाच्या काळातही कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर लावणे, म्युकरमायकोसिसच्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणे आदींमध्ये भूलतज्ज्ञांचा मोठा वाटा असतो. ह्रदय बंद पडल्यानंतर रुग्णांचा जीव कसा वाचवावा, याबाबतची प्रथमोपचार पद्धती, जीवनदाता कसे बनावे, याबाबत या प्रभात फेरीत जनजागृती केली जाणार आहे. या जनजागृतीबबतचा पुणेकरांनी लाभ घेण्याचे आवाहन या संघटनेच्या अध्यक्षा डॉ. प्रज्ञा भालेराव, सचिव डॉ. सुनीता खेडकर, खजिनदार डॉ. सुषमा तांदळे, डॉ. पल्लवी बटयानी,डॉ. अर्चना जाना,डॉ.हनुमंत साळे आदींसह आय. एस. ए. च्या पुणे शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Schedule : १४ वन डे, १६ ट्वेंटी-२० अन् ७ कसोटी! IPL 2027 पर्यत टीम इंडियाचं वेळापत्रक; विराट, रोहितच्या फॅनसाठी मेजवानी

FDA: एफडीएचा दणका! IRCTCचे बेस किचन आणि इस्कॉनमध्ये धडक कारवाई, कॅटरर्सचे परवाने थेट निलंबित

तेजश्री प्रधान जर ८० च्या दशकातील हिरोईन असती तर... पाहा झक्कास फोटो, तुम्हीही सहज बनवू शकता

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT