BLIND-ACTOR 
पुणे

पिंपरीत अंध कलाकारांनी केले डोळसपणे समाजप्रबोधन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात दृष्टी आणि आवाजाला खूप महत्त्व आहे. आवाज दृष्टीहिनांचे सामर्थ्य तर स्पर्श हे माध्यम. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्श हे माध्यम पण त्यांच्यासाठी व्यर्थ ठरले आहे. आपण सर्वजण सिनेमे, टीव्ही पाहू शकतो. सोशल मीडियावर रमू शकतो. खिडकीतून का होईना सूर्योदय आणि सुर्यास्ताचा आनंद घेऊ शकतो. किती बोअर झालोय यार असा सूर ही वारंवार आळवतो. मात्र, या सर्व अडचणींवर मात करत महाराष्ट्रभरातील अंध कलाकार लॉकडाउनमध्ये अडकलेल्या अंध फेरीवाल्यांसाठी दूत ठरले आहेत. एवढ्यावरच न थांबता डोळसांनाही लाजवेल अशा पद्धतीने त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले आहे.

मुंबई, पुणे येथील हातावर पोट असलेल्या रेल्वेतील फेरीवाल्यांसाठी हे अंध धावले आहेत. बऱ्याच जणांनी अन्नधान्य स्वरूपात मदत केली आहे. "तीन पैशाचा तमाशा" यातील हे अंध कलाकार आहेत. या नाटकाचे तीन प्रयोग झाले आहेत. बाकी लॉकडाउनमुळे रद्द झाले आहेत. हे सर्व दृष्टिहीन कोरोनामुळे गावी आहेत. कोणी रोहा, हिंगोली, कोणी म्हाडा, कोणी निगडी व पुण्यातील आहेत. या सर्वांचं समाजभान जागृत आहे. यातल्या अनेक जणांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत अंध फेरीवाल्यांसाठी निधी जमा केला आहे. अनेकांनी आपल्या पगारातला काही भाग त्यांच्यासाठी पाठवला आहे. या उपक्रमासाठी स्वागत थोरात, विना ढोले, ऋचा पाटील यांनी मदत केली आहे.

आम्हांला या सगळ्यांचा सार्थ अभिमान आहे. समाजाकडून ज्ञान आणि भान घेता-घेता देणारे हात तयार झाले आहेत. एक नवी पिढी घडते आहे, असे अंधांच्या सावी फाउंडेशनच्या रश्‍मी पांढरे यांनी सांगितले.

हे आहेत अंधांचे दूत
काकासाहेब पांडव, संतोष कसबे, सुंदर सोंडे, बेला सोंडे, वृषाली शेख, गौरव घायले, बिपीन वर्तक, अक्षय मोहिते, पवन नागरे, हेमांगी धामणे, अद्वैत मराठे, तृप्ती चौधरी, सौरभ चौगुले, प्रवीण पालके, विकी शेट्टी, तेजस्विनी भालेकर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil and Devendra Fadnavis : शरद पवारांचे खासदार दिल्लीत नरेंद्र मोदींच्या भेटीला जाण्यापूर्वी जयंत पाटील-फडणवीसांचा एकत्र विमान प्रवास; राजकीय चर्चांना उधाण

IND vs SLC XI Warm up: बोटाला दुखापत झालेल्या शुभमन गिलचं मैदानात कमबॅक, आता पहिल्या कसोटीत खेळणार?

Thane News: ठाणेकरांच्या खिशाला कात्री! मालमत्ता कर तसेच टीएमटीचे तिकीट दरवाढ करण्याचा प्रस्ताव

मला मराठ्यांपासून लांब ठेवण्याचा पूर्वनियोजित कट; मनोज जरांगे आक्रमक, सरकारवर सडकून टीका

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जी यांच्या ताफ्यावर हल्ला, कारवर फेकला चिखल

SCROLL FOR NEXT