Awareness through films for Arogyam Dhansampada pm shah Foundation Adv Chetan Gandhi Initiative sakal
पुणे

Pune : ‘आरोग्यम् धनसंपदा’साठी चित्रपटांद्वारे जागृती!

पी. एम. शहा फाउंडेशनकडून महोत्सव; अॅड. चेतन गांधी यांचा पुढाकार

समाधान काटे

पुणे : चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून आरोग्याविषयी चित्रपट महोत्सवाचे आयोजन पुण्यात २००९ पासून पी. एम. शहा फाउंडेशनच्या माध्यमातून अॕड. चेतन गांधी यांच्या वतीने केले जाते. या चित्रपट महोत्सवात कलकत्ता, तमिळनाडू, आसाम, दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाना देशभरासह देशाबाहेरील चित्रपट असतात.

यामध्ये प्रामुख्याने सामान्य, तरुण, महिला, लहान मुले, स्वच्छता अशा विविध विषयांवर दरवर्षी डिसेंबर महिन्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, लॉ कॉलेज रस्ता येथे चित्रपट प्रदर्शित होतात. चित्रपट महोत्सवात सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. दोन दिवस चालणाऱ्या चित्रपट महोत्सवात सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश खुला असतो.

प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना

प्रत्येक वर्षी नवीन संकल्पना घेऊन चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. अनुभवी जुरी चित्रपट पाहून उत्कृष्ट चित्रपटाला नामांकन देतात. यातील महत्त्वाचे निवडलेले चित्रपट विविध शाळांतील विद्यार्थ्यांना दाखवले जातात, ज्यामधून शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक जनजागृती निर्माण व्हावी आणि त्याचे महत्त्व समजावे, हा हेतू असतो.

फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर तुमच्या भेटीला हा उपक्रम प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी राबवला जातो. यामध्ये आरोग्यविषयक व्याख्यान, शिबिरे या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यविषयक जनजागृती निर्माण केली जाते.

लोकरंजनातून लोकप्रबोधन या गोष्टींचा सारासार विचार करून सामान्य नागरिकांचे आरोग्याचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोचावे व नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने चित्रपट महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामधून आरोग्याविषयी चित्रपटांना चांगले स्थान प्राप्त होते.

- अॕड. चेतन गांधी, संचालक, पी. एम. शहा फाउंडेशन

दृष्टिक्षेपात

  • एक ते तीस मिनिटांचे लघु चित्रपट व एक ते साठ मिनिटांचे माहितीपट

  • उत्कृष्ट लघु चित्रपट आणि उत्कृष्ट माहितीपटासाठी प्रत्येकी तीन बक्षिसे

  • लोकमनोरंजनातून आरोग्यविषयक जनजागृती ही संकल्पना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhagyashree Patwardhan : अभिनेत्री भाग्यश्रीने आरती केली, विजयसिंहराजेंचा लेकीसोबतचा वाद पुन्हा उफाळला; राजवाड्याच्या दरबार हॉलमध्ये काय घडलं?

Pune News: महसूल विभागात खळबळ! जमिनींवर परस्पर कुळ लावल्याच्या तक्रारी; राज्यभरातील मंजूर प्रकरणांची तपासणी, महसूलमंत्र्यांनी काय दिले आदेश?

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Latest Marathi News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गणपती आगमन सोहळा मिरवणुकीला गालबोट, दोघांचा अपघाती मृत्यू

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

SCROLL FOR NEXT