१५ ऑगस्टला ग्रामसभेत ठरणार
‘आवास प्लस’ची अंतिम यादी
पात्र लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ५ : प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आवास प्लस-२०२४ मोहिमेतील कायम प्रतीक्षा यादी अंतिम करण्यासाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेत मसुदा लाभार्थी यादी सादर करून त्यावर नागरिकांकडून सूचना, हरकती व शिफारशी स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर अंतिम कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे.
ग्रामसभेत आवास प्लस-२०२४ मधील मसुदा लाभार्थी यादी सर्वांसमोर ठेवण्यात येईल. प्रत्येक लाभार्थ्याची माहिती व पात्रतेची पडताळणी केली जाईल. चुकीची नावे, अपात्र लाभार्थी किंवा आवश्यक बदलांबाबत ग्रामसभा शिफारस करेल. ग्रामसभेच्या शिफारशींच्या आधारे अंतिम कायम प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायतींनी मसुदा यादी सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी. ग्रामसभेचे जिओ-टॅग फोटो व कार्यवाही ऑनलाइन अपलोड करावी.
ग्रामसभेने सुचविलेले बदल AwaasSoft प्रणालीमध्ये नोंदवावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम लाभार्थी यादी जाहीर केली जाईल. दरम्यान, ग्रामसभा सुरू होण्यापूर्वी कायम प्रतीक्षा यादी उपलब्ध असणे आवश्यक असून, सर्व बदल केवळ ग्रामसभेच्या शिफारशीनुसारच करण्यात येणार आहेत. अपूर्ण किंवा चुकीची कागदपत्रे अपलोड करू नयेत, अशा सूचना संबंधित ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.