Bhidewada 
पुणे

भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकापासून दूर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू करून, त्यांच्या जीवनात शिक्षणाची ज्योत तेवती केली, ते ठिकाण म्हणजे भिडेवाडा. या जागेला राष्ट्रीय स्मारकाला दर्जा मिळावा म्हणून गेली २१ वर्षे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही त्याला यश मिळालेले नसून, स्मारकाचा मुद्दा प्रलंबित आहे.

सावित्रीबाई फुले आणि जोतिराव फुले यांनी एक जानेवारी १८४८ रोजी याच बुधवार पेठ परिसरातील भिडेवाड्यात मुलींसाठी शाळा सुरू केली. त्याचे राष्ट्रीय स्मारक व्हावे, अशी मागणी ‘मुलींची पहिली शाळा सार्वजनिक स्मारक समिती’च्या वतीने पुढे आली. शाळा स्थापनेला १९९८ मध्ये दीडशे वर्षे पूर्ण झाली, त्या वेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव, नितीन पवार यांनी फुलेवाडा ते भिडेवाडा अशी मिरवणूक काढली होती. त्या वेळेपासून हे स्मारक करावे, या मागणीने जोर धरला आहे.

शाळेचे स्मारक होण्यासाठी प्रयत्न करणारे नितीन पवार म्हणाले, ‘‘सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या या शाळेचे राष्ट्रीय स्मारक होण्यात राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. पुणे महापालिकेने स्मारक करण्याचा ठराव केला. त्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील पावणेदोन कोटी रुपये भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे भरलेदेखील आहेत. मात्र, त्यानंतर स्मारक होण्याच्यादृष्टीने कोणत्याच सरकारने प्रयत्न केलेले नाहीत.’’

भिडेवाड्यात आता दोन गुंठे जागा राहिली आहे. त्यात जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात आहे. परंतु राज्य सरकारने यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. त्यांना योग्य तो मोबदला देऊन, ही जागा मिळवली पाहिजे आणि तेथे शक्‍य तितक्‍या लवकर स्मारक उभे केले पाहिजे. गेली २१ वर्षे आम्ही त्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन सत्तेवर आलेल्या राजकीय नेत्यांनी या प्रश्‍नी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT