पुणे

राज्यातील व्यावसायिकांसाठी ॲक्सिस बँक प्रयत्नशील

CD

राज्यातील व्यावसायिकांसाठी  ॲक्सिस बँक प्रयत्नशील 
मुंबई, ता. २३ : राज्यातील लघु, मध्यम आणि सूक्ष्म व्यावसायिकांच्या उन्नतीसाठी (एमएस एमई) ॲक्सिस बँक प्रयत्न करत असून, त्यांच्यासाठी अनेक पर्यायाद्वारे भांडवलाची उपलब्धता वाढवित असल्याचे बँकेचे ग्रुप हेड संजीव मोघे यांनी सांगितले.

बँकेच्या कमर्शियल बँकिंग ग्रुपचे ग्रुप हेड विजय शेट्टी आणि मिड कॉर्पोरेट ग्रुपचे ग्रुप हेड प्रशांत टी. एस. यांनी बँकेच्या व्यवसायविस्ताराच्या प्रयत्नांची माहिती दिली. मुंबई, पुणे, नाशिक या औद्योगिक परिसरात बँकेची प्रमुख व्यावसायिक केंद्र आहेत, असेही त्यांनी सांगितले. 
महाराष्ट्रात या क्षेत्रात कर्जाची मागणी मोठी असून त्यात कापड, पोशाख, रसायने, अभियांत्रिकी, अन्नप्रक्रिया, दळणवळण, वाहतूक आदी क्षेत्रांचा समावेश आहे. या व्यवसायांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी छोटे उद्योग; तसेच महिलांच्या नेतृत्वाखालील ‘एमएसएमई’ त्याचप्रमाणे नवे व्यावसायिक आणि आतापर्यंत संघटित बँकिंग क्षेत्राचा लाभ न मिळालेले व्यावसायिक यांच्यावर बँक लक्ष केंद्रित करत आहे. त्यांच्या गरजेनुसार तयार केलेले कर्जांचे पर्याय, त्यांच्यासाठी माहिती प्रशिक्षण सत्रे आणि एकत्रित बँकिंग सेवांच्या बुकेमार्फत बँक त्यांना औपचारिक कर्जाद्वारे भांडवल पूरवीत आहे, असेही मोघे यांनी सांगितले. 
त्याचप्रमाणे ॲक्सिस बँक इव्हॉल्व्ह आणि डिजिटल इव्हॉल्व्ह यासारखे उपक्रम बँक राबवते. त्यामार्फत या व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास, डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यास आणि बदलत्या बाजारपेठेची व्याप्ती समजून घेण्यास मदत करते. ‘वन ॲक्सिस’ या उपक्रमाद्वारे बँकिंग सेवा, कर्ज, व्यापार, संपत्तीनिर्मिती आणि इन्व्हॉइस डिस्काउंटिंग सोल्युशन असे पर्याय एकत्रितरित्या दिले जातात. त्यामुळे व्यवसायांना या सर्व आर्थिक परियंत्रणेचा एकत्रित लाभ घेता येतो, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

Thane Illegal Schools: प्रवेशापूर्वी सावध व्हा! ठाणे जिल्ह्यातील बेकायदा शाळांची यादी जाहीर; पालकांना प्रशासनाचा इशारा

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रातील प्रत्येक गावात वेदर स्टेशन उभारणार, पीक नुकसानीचे अचूक मोजमाप होणार

Sickle Cell Test: लग्नाआधी करा 'ही' रक्त तपासणी; भविष्यात तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी ठरू शकते महत्त्वाची

Latest Marathi News Live Update : वाशिमच्या मानोरा-मंगरुळपीर तालुक्यात पावसाच्या सरी

SCROLL FOR NEXT