पुणे

ॲक्सिस मॅक्स लाइफकडून विक्रमी दावे निकाली

CD

‘ॲक्सिस मॅक्स लाइफ’कडून विक्रमी दावे निकाली

पुणे, ता. २३ : ॲक्सिस मॅक्स लाइफ इन्शुरन्स लि. कंपनीने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये वैयक्तिक मृत्यू दाव्यांच्या निकाली काढण्याच्या प्रमाणात विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. कंपनीने यावर्षी २०,५२९ वैयक्तिक मृत्यू दावे मंजूर करत तब्बल १,६४१ कोटी रुपयांची रक्कम वितरित केली आहे. यामुळे कंपनीचा वैयक्तिक मृत्यू दावा निकाली काढण्याचा दर ९९.८ टक्क्यांवर पोहोचला असून, हा आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर आहे.

मागील पाच वर्षांमध्ये कंपनीच्या दावा निकाली काढण्याच्या प्रमाणात सातत्याने वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२१ -२२ मध्ये हा दर ९९.३४ टक्के होता, तो २०२२ -२३ मध्ये ९९.५१ टक्के, २०२३ -२४ मध्ये ९९.६५ टक्के, २०२४-२५ मध्ये ९९.७ टक्के आणि २०२५-२६ मध्ये ९९.८ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. कंपनीच्या स्थापनेपासून आजपर्यंत एकूण २,४३,५२४ पॉलिसींवरील दाव्यांपोटी ११,७७२.२१ कोटी रुपयांहून अधिक रक्कम देण्यात आली आहे.
याबाबत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुमित मदान म्हणाले, ‘‘ॲक्सिस मॅक्स लाइफमध्ये दावे जलदगतीने निकाली काढण्यासाठी प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स आणि डिजिटल फॉरेन्सिक्ससारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. त्यातून दावे निकाली काढण्याचा विक्रमी दर हा केवळ एक आकडा नसून, ग्राहकांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे. प्रत्येक दाव्यामागे एका कुटुंबाची सुरक्षितता दडलेली असते आणि त्यांचे संरक्षण करण्याचा आम्हाला अभिमान आहे, याची तो आठवण करून देतो.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बीकेसी मेट्रोच्या बेसमेंटमध्ये शिरला विषारी पाहुणा! दोन फूट लांबीचा रसेल्स वायपर सापडला, कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

PUC नियमांमध्ये मोठा बदल! नवीन वाहनधारकांना मिळणार खास सूट; पण जुनी गाडीधारकांच्या अडचणी वाढणार? जाणून घ्या RTOचा प्लॅन

Forest Crackdown: सुधागडात खैर तस्करीवर वनविभागाचा धडाकेबाज छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार जण अटकेत

Latest Marathi News Live Update : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर आसूड मोर्चा

Ira Jadhav: मुंबईची 'रन-मशीन' आयरा जाधवची टीम इंडियात निवड; T20 आणि ODI दोन्ही संघात स्थान मिळवत वाढवला मुंबईचा मान!

SCROLL FOR NEXT