पुणे

माश्यांच्या मेजवानीवरून राजकीय ‘काटाकाटी’

CD

माश्यांच्या मेजवानीवरून
राजकीय ‘काटाकाटी’

अयोध्येत राय यांच्या कार्यक्रमावरून आरोप-प्रत्यारोप

अयोध्या, ता. २४ (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांच्या अयोध्येतील स्वागतासाठी मासे आणि अन्य मांसाहारी पदार्थांच्या मेजवानीचे आयोजन केल्याचा आरोप भाजपने केला आहे. या दाव्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये जुंपली असून, श्रावण महिन्यामध्ये मांसाहारी पदार्थांची मेजवानी आयोजित केल्याचा आरोप काही स्थानिक व्यक्तींनी केला आहे.
अयोध्येतील एका सभागृहामध्ये राय यांच्या स्वागताचा कार्यक्रम होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाले आहे. यातून काँग्रेसची दुटप्पी वागणूक दिसत आहे, असा आरोप मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. अजय राय एकीकडे रामजन्मभूमी मंदिर, हनुमानगढी येथे दर्शन घेतले आणि त्यानंतर दुपारी त्यांनी मांसाहारी पदार्थांची मेजवानी केली, असे त्यांनी म्हटले आहे.
तर, मांसाहारी पदार्थ खाल्ल्याचा पुरावा दाखविण्याचे आव्हान राय यांनी दिले आहे. ‘‘मला निषाद समाजाने कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते, त्यानुसार मी तेथे गेलो. त्या ठिकाणी कोणते पदार्थ तयार करण्यात आले, हा आयोजकांचा प्रश्न आहे. मी मांसाहारी पदार्थ खाल्ल्याचे छायाचित्र किंवा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांनी दाखवावा,’’ असे राय यांनी म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या आवडीनुसार अन्न खाण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असे आयोजकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कोयत्याचा शोध कोणी लावला? शेतकऱ्याच्या अवजाराला गुन्हेगारी शस्त्राचा रंग कसा लागला?

पुण्यातील मंदार किवळे हल्ला प्रकरणात मोठी कारवाई! पोलिसांनी पाच आरोपींना दौंडमधून घेतलं ताब्यात

Mumbai Indians चा कॅप्टन कोण, रोहित शर्मा की दुसरं कोणी? त्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

Pune Bopdev Ghat Accident Breaking : पुण्यातील बोपदेव घाटात भीषण अपघात! भरधाव आयशर टेम्पो बस स्टॉपवरील विद्यार्थ्यांच्या घोळक्यात शिरला; २ जणांचा मृत्यू तर ३ गंभीर

Latest Marathi News Live Update: अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बॅक रोडवर कांदळवनाला भीषण आग

SCROLL FOR NEXT