ayodhya ram mandir inauguration pune pooja to send a gift of madhubani art devi sita Sakal
पुणे

Ayodhya Ram Mandir : सीतेच्या माहेरची चित्रकला पुण्याहून आयोध्याला रवाना

आयोध्यात श्रीराम मंदिरात राम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा होत आहे, त्यानिमित्त सर्व देशात उत्साहाचे वातावरण आहे, प्रत्येकजण यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होत आहे. यानिमित्त पुण्यातील मगरपट्टा येथील रहिवासी पूजा झा यांनी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त मधुबानी चित्रकलेच्या अनोखी भेट अयोध्याला पाठवली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- प्रयागा होगे

घोरपडी : आयोध्यात श्रीराम मंदिरात राम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा होत आहे, त्यानिमित्त सर्व देशात उत्साहाचे वातावरण आहे, प्रत्येकजण यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सहभागी होत आहे. यानिमित्त पुण्यातील मगरपट्टा येथील रहिवासी पूजा झा यांनी श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा निमित्त मधुबानी चित्रकलेच्या अनोखी भेट अयोध्याला पाठवली आहे.

पूजा झा मूळच्या सीतेचे माहेर मैथिला येथील रहिवासी आहेत. येथील मैथिली / मधुबनी चित्रकला जगभर प्रसिद्ध आहे. त्यांनी या कलेच्या माध्यमातून एकूण २७ चित्रांचे एकत्रित असे चित्र काढले आहे. रामायणातील ठळक घटनांवर हे चित्र रेखाटले आहे.

यासाठी सात ते आठ प्रकारचे फॅब्रिक रंग वापरले असून ५*७ फुटच्या कॅनवासवर हे चित्र काढले आहे. रोज पाच ते सात मेहनत घेऊन अडीच महिन्यात हे चित्र पूर्ण केले आहे. हे चित्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अयोध्याला पोहचले असून सध्या राम मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात लावल्यात येणार आहे.

तसेच भविष्यात मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर तिथे विविध कलांचे दालन होणार असून त्यामध्ये हे चित्र लावण्यात येईल असे पूजा झा यांनी सांगितले. या चित्रात पुत्र प्राप्ति यज्ञ, श्रीराम जन्म,गुरूकुल शिक्षा, ताड़कासुर, अहिल्या उद्धार, श्री राम विवाह, वर्ष वनवास- प्रस्थान, चरण पादुका - भरत,

सूर्पनखा वध,स्वर्ण मृग, रावण द्वारा माता सीता हरण,जटायू-रावण युद्ध ,जटायू-श्री राम मिलन, शबरीकथा, हनुमान जी सहित सुग्रीव मिलन,बालि-सुग्रीव - युद्ध,सुग्रीव राज्याभिषेक, अशोक वाटिका - हनुमान जी द्वारा माता सीता को प्रभू श्रीराम की अंगूठी भेंट,लंका-दहन,राम-सेतु श्रीराम, विभीषण मिलन + कुंभकर्ण-श्रीराम युद्ध

,मेघनाद-लक्ष्मण युद्ध- मूर्च्छित लक्ष्मण-हनुमान जी द्वारा संजीवनी बूटी प्रसंग,लक्ष्मण जी द्वारा मेघनाद वध,श्रीराम रावण - युद्ध ,माता सीता - अग्नि परीक्षा,वनवास पूर्ण-अयोध्या पुनरागमन प्रभू श्रीराम दरबार या विविध घटना अतिशय सुरेख व सुंदर पद्धतीने मांडल्या आहेत.

नाजूक व रंगीबेरंगी चित्रांनी संपूर्ण रामायण पूजा झा यांनी एका कॅनवासवर काढले आहे. बोटांनी, ब्रशेस, निब-पेन आणि मॅचस्टीक्ससह आणि विविध रंगांच्या साहाय्याने ही चित्र काढले आहेत.

पूजा कुमारी झा यांनी दहा वर्षाच्या असल्यापासून ही चित्र काढायला सुरुवात केली. त्यांनी याबाबत व्यावसायिक प्रशिक्षण घेतले नाही परंतु आजूबाजूच्या महिलांची कला पाहून त्यांनी ही कला आत्मसाद केली.वयाच्या ११ व्या वर्षी त्याची चित्रकला वृत्तपत्रांत लहान मुलांच्या स्तंभात प्रकाशित झाली होती.

तसेच या चित्रकलेसाठी राज्य स्तरीय पारितोषिक मिळाले आहेत. सोबतच अमेरिकेच्या सिराक्यूज विद्यापीठ,प्रिन्स्टन विद्यापीठ, दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासमध्ये त्यांनी काढलेली दुबई चित्रे लावण्यात आली आहेत. बाली पपेट शो मध्ये त्यांना ही कला सादर करण्याची संधी मिळाली होती.

त्यांना पारंपरिक पद्धतीने मिळालेली ही कला त्या मनापासून जोपासत असून समाजातील इतर महिलांना त्या मिथिला चित्रकला शिकवत आहेत. आतापर्यंत सुमारे दोनशे महिलांना व विद्यार्थ्यांना ही कला शिकवली आहे.

पूजा झा, मधूबनी कलाकार

आयोध्यात श्रीराम मंदिरात राम प्रभूंची प्राण प्रतिष्ठा निमित्त सर्व देशात मोठा सोहळा साजरा होत असून त्यासाठी मी कलेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही कला अयोध्येत पोहचली यांचा आनंद असून त्यासाठी मी स्वतः भाग्यशाली समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT