पुणे

मतमतांतरे, शुक्रवारसाठी

CD

कुंपणानेच शेत खाल्ले
अयोध्येच्या श्रीराम मंदिरातील दानपेटीत अपहार झाल्याचे आता सिद्ध झाले आहे. अर्थात हा घाला केवळ प्रभू रामचंद्रांच्या तिजोरीवरच घातला असे नाही; तर भाविकांच्या विश्वासावरदेखील केलेला आहे. कारण ज्यांच्या विश्वासावर भाविकांनी भरभरून दान दिले तेच चोर निघाले. कुंपणानेच शेत खाण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळेच यात दोषी असलेल्या सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी; तसेच दोषींकडून अपहार केलेल्या सर्व पैशांची वसुली करायला हवी. असे केले तरच भाविकांच्या विश्वासघात करणाऱ्यांवर जरब बसेल.
- श्याम ठाणेदार, दौंड

जबाबदारही सर्वांनाच धरावे
संविधानानुसार कोणताही मंत्री कोणत्याही खात्याची उत्तरे देऊ शकतो, असे विधानसभा अध्यक्षांनी पावसाळी अधिवेशनात सांगितले. असे असेल तर सर्वांकडेच सर्व खात्यांची जबाबदारी असावी व त्या खात्यातील भष्टाचार, गोंधळ, अनियमितता, अकार्यक्षमता याची जबाबदारीही सर्वांची व्हावी. झालेला भष्टाचार, अनियमितता व ठपका याची जबाबदारी स्वीकारून सर्वांनीच मग मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा.
- प्रकाश करवा, पुणे

...अशा लोकशाहीला अर्थ नाही
भ्रष्ट राजकारणी व उच्चपदस्थ भ्रष्ट अधिकारी जोपर्यंत पैसा खाणे, भ्रष्टाचार करणे हा जन्मसिद्ध हक्क समजतात, तोपर्यंत या लोकशाहीला काहीही अर्थ नाही. ही भ्रष्टाचारशाही आहे. जनतेचे रक्षण करणारी, जनतेचे प्रश्न सोडविणारी‌‌ लोकशाही असते. छत्रपती संभाजीनगरला गेली २० वर्षे पिण्याचा प्रश्न शिवसेनेला सोडविता आलेला नाही. अशा प्रादेशिक पक्षांचा काय फायदा?
- विवेक जोशी, संभाजीनगर

त्याग कायम लक्षात राहवा
आणीबाणी लागू केली गेली त्याला ५० वर्षे झाली आहेत. भारतीय लोकशाहीचा काळा दिवस. आणीबाणीचा १९ महिन्यांचा कालखंड म्हणजे लोकशाहीचा खून होता. या कृतीला भारतीय नागरिकांनी कधीही विसरू नये. लोकशाही अमर राहावी म्हणून जागरूक असले पाहिजे. फार मोठ्या प्रमाणावर संपूर्ण देशातून राष्ट्रभक्त नागरिकांना स्थानबद्ध करण्यात आले होते. लोकशाहीच्या रक्षणासाठी या सर्वांनी केलेला त्याग कायम लक्षात रहावा.
- मोहन रानडे, पुणे

सुरक्षिततेबाबत खात्री करावी
दहावी, अकरावीत असलेली मुले ट्युशनला जातात. ज्या इमारतीत क्लास आहेत, तेथील इमारत कशी आहे?, तेथील वीज व्यवस्था योग्य आहे का?, सुरक्षितता आहे का?, आग लागली तर बाहेर त्वरित पडण्याची व्यवस्था आहे का?, या सर्व गोष्टी तपासून घ्याव्यात. लखनौमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. तशी घटना कुठेच होऊ नये यासाठी सतर्क राहणे आवश्यक आहे.
- तेजपाल शहा, पुणे

‘सीडबाॅल’चा वापर करावा
सध्या ‘सीडबाॅल’ प्रचलित आहे. प्रशासनाने फळांच्या बिया घालून ओल्या मातीचे गोळे तयार करून प्रत्येक वारी गटाला वाटावीत. वारीचा मुक्काम जेथे असेल तेथे द्यावीत. एकदा मुक्काम पुढे गेला की काही ‘सीडबाॅल’ शहराच्या टेकड्यांवर टाकावेल. शास्त्रीय पद्धतीने कमी पावसात फळझाडे शक्य आहेत. यासाठी बेरोजगार तरुणांची मदत घ्यावी. त्यांनाही उत्पन्नाची सोय होईल. टेकडीफोडवर नियंत्रण येईल. टेकड्यांवरील फळबागांनी सौंदर्यात वाढ होईल.
- नीलम सांगलीकर, पुणे

‘रिव्हर्स स्विप-स्कूप’ आवरा
हल्ली फलंदाजामध्ये ‘रिव्हर्स स्विप स्कूप’चे वारे भरले आहे. भारतीय संघात जरा जास्तच. फलंदाजीला येऊन जराशी सुरवात होत नाही वा स्थिरावत होत नाही तोच हा फटका मारायला जाऊन बाद होतात. सध्या टी-२० विशवचषकातील भारत-दक्षिण आफ्रिका सामन्यात, स्मृती मानधना पण स्थिरावत नाही तोच ती असा उलटा स्विप-स्कूप फटका मारायला जाऊन सहजगत्या त्रिफळाचीत झाली. आता पुढे येणारा प्रत्येक सामना महत्त्वाचा असताना आघाडीच्या फलंदाजांकडून अशी बेफिकिरी न परवडणारीच. भारतीय पुरुषांच्या सर्व प्रकारच्या सामन्यांत पण अशी स्थिरावण्याआधी बेफिकिरीने बाद होण्याची अनेक उदाहरणे दिसून येत आहेत.
- मंजिता चौधरी, मुंबई

शेतकऱ्यांनी स्वीकारावी नवी दृष्टी
सध्या हवामानातील अनिश्चितता ही शेतीपुढील सर्वांत मोठी समस्या बनली आहे. पूर्वी पावसाळा ठराविक वेळेत सुरू होत असे आणि त्यानुसार शेतकरी पिकांचे नियोजन करत असत; मात्र गेल्या काही वर्षांत मॉन्सूनचे आगमन उशिरा होणे, कमी-अधिक पाऊस पडणे, अवकाळी पाऊस, दुष्काळ आणि पूर यांसारख्या परिस्थिती वारंवार निर्माण होत आहेत. त्यामुळे पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून हवामानानुसार पिकांचे नियोजन करणे ही काळाची गरज बनली आहे. बदलत्या हवामानाशी जुळवून घेणारा शेतकरीच भविष्यात यशस्वी ठरणार आहे. त्यामुळे ‘हवामान बदलले तर पिकांचे नियोजनही बदलले पाहिजे’, हा मंत्र स्वीकारून आधुनिक आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करणे हीच काळाची खरी गरज आहे.
- धोंडपा नंदे, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizenship Proof Law: पासपोर्ट हा फक्त प्रवासाचा दस्तऐवज; तर भारतीय नागरिकत्वाचा खरा पुरावा कोणता? कायदा काय सांगतो?

India vs Ireland सामन्याची वेळ बदलली; नेमका किती वाजता सुरू होणार आणि कुठे पाहता येणार? कारण काय तर

आणि स्वतःच्या खिशात काहीही नसताना श्रेयसने मला पैसे दिले... जितेंद्र जोशीने सांगितला तो प्रसंग, म्हणाला, 'आता तो...'

Air India Flight Incident : एअर इंडियाचे विमान अचानक पाकिस्तानात पोहोचले, वैमानिकावर कारवाई; चूक की जाणीवपूर्वक रचलेले कारस्थान?

Health Numerology : 'या' 2 मुलांकाच्या लोकांना शारीरिक व्याधी होतात सगळ्यात कमी; एक सवय बदलून टाकते आयुष्य, जगतात सुखी जीवन

SCROLL FOR NEXT