Dr. Pramod Sawant sakal
पुणे

Pune News : आयुर्वेदाचे मार्केटिंग करा - डॉ. प्रमोद सावंत

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेदा विषयी आजही जागृती करण्याची वेळ येणे निश्चितच खेदजनक आहे. आयुर्वेदाच्या उपचारांबरोबरच आता मार्केटींगचीही गरज आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आयुर्वेदा विषयी आजही जागृती करण्याची वेळ येणे निश्चितच खेदजनक आहे. आयुर्वेदाच्या उपचारांबरोबरच आता मार्केटींगचीही गरज आहे. असे मत गोव्याचे मुख्यमंत्री आणि आयुर्वेदातील स्नातक डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

टिळक आयुर्वेद महाविद्यालयाच्या ९० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त), राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. दिलीप पुराणिक, डॉ. व्ही.के.भागवत, प्राचार्य डॉ. सदानंद देशपांडे आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, ‘आयुर्वेदाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी हार मानत नाही. म्हणूनच मी आमदार, सभापती आणि मुख्यमंत्री झाले. २०१४ मध्ये आयुष मंत्रालय स्थापन करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुर्वेदासह सर्वच भारतीय उपचार पद्धतींना राजाश्रय दिला. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे आता आयुर्वेदालाही जागतिक मान्यता मिळाली आहे.

डॉ. कानिटकर म्हणाल्या, ‘वैद्यकशास्त्रातील शिक्षण, संशोधन आणि स्वास्थ्य यांना एकत्र करावे लागेल. त्यासाठी अगदी शालेय स्तरापासूनच आपल्याला काम करावे लागेल. सर्व उपचारपद्धतींच्या सर्वसमावेशक वापरासाठी आपल्याला काम करावे लागेल.’ आधुनिक उपचारशास्त्रात अचूक औषधांबद्दल बोलले जात असून, आयुर्वेदाने मात्र हजारो वर्षांपूर्वीच प्रतिबंधात्मक उपचार पद्धतीवर काम केले आहे, असेही डॉ. कानिटकर यांनी सांगितले.

डॉ. देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. २५ वर्षांपूर्वी महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या स्नातकांपैकी चार जणांचा कार्यगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी आयुर्वेदाचे रोजच्या आयुष्यातील महत्त्व सांगणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

आपण वेलनेस बद्दल फार बोलतो. पण काम मात्र इलनेसवरच करतो. वेलनेसकडे प्रवास करण्यासाठी ‘आय’ काढून ‘वी’ टाकावा लागेल. अर्थात सर्वच उपचार पद्धतींना एकत्र येत मानवी स्वास्थ्यासाठी काम करावे लागेल.

- डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT