Ayurved Sakal
पुणे

Cancer Patient : आयुर्वेद रसायनांनी सुधारले कर्करुग्णांचे आयुष्य

कर्करोगावर आधुनिक उपचारांबरोबरच आयुर्वेदातील रसायनांची सांगड घातल्याने रुग्णाची प्रकृती सुधारते.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कर्करोगावर आधुनिक उपचारांबरोबरच आयुर्वेदातील रसायनांची सांगड घातल्याने रुग्णाची प्रकृती सुधारते. केमोथेरपीसारख्या उपचारांचा होणारा दुष्परिणाम टाळता येतोच, पण रुग्णाच्या जीवनाची गुणवत्ता वाढून आयुर्मान वाढणे शक्य आहे, असा निष्कर्ष पुण्यातील वैद्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडला.

‘सोसायटी फॉर इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजी’तर्फे कॅनडा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद आणि आधुनिक उपचारांबाबत परिषदेत हा निष्कर्ष सादर केला. रसायू कॅन्सर क्लिनिकचे प्रमुख वैद्य योगेश बेंडाळे आणि प्रमुख संशोधक डॉ. अविनाश कदम यांनी ही मांडणी केली. डॉ. कदम म्हणाले, ‘कर्करोगाच्या आधुनिक उपचारांबरोबर रसायू कॅन्सर क्लिनिकमधील रसायनांची यशस्वी सांगड उपचारात घालण्यात आली.

त्यामुळे रुग्णांची उपचाराकडे बघण्याची सकारात्मक दृष्टी तयार झाली. त्यातून उपचारांना प्रतिसाद मिळू लागला. रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा स्पष्ट दिसून आली. हे परिवर्तन घडवून आणण्याची शक्ती आयुर्वेद रसायन चिकित्सेमध्ये आहे.’

रसायन थेरपी कशी काम करते?

आयुर्वेद ही भारतीय चिकित्साप्रणाली त्यातील रसायन ही अत्यंत प्रमुख शाखा. जी शरीर, मन आणि आत्म्यासह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये संतुलन करण्याचा प्रयत्न करते. रसायन चिकित्सेचा प्रमुख उद्देश रुग्णाची चिकित्सा करणे, तसेच आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य मिळवणे हा आहे. यामध्ये शरीर आणि मानसिक स्तरावरील व्याधिप्रतिकार शक्तीवर प्राधान्याने कार्य केले जाते.

रसायन चिकित्सेचा उपयोग कर्करोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या प्रयत्नासाठी तसेच, प्रगत अवस्थांतील कर्करोगाच्या रुग्णांमध्ये आयुष्याची गुणवत्ता वाढण्यासाठी केला जातो. तसेच या रुग्णांना दीर्घायुष्य मिळवण्याचा उद्देश साध्य केला जातो.

असे केले संशोधन

  • वैद्य आणि संशोधकांच्या पथकाने १५५ कर्करुग्णांचा बारकाईने अभ्यास केला

  • संशोधनपूर्व सर्वेक्षण केले, आयुर्वेदिक उपचार पद्धती

  • स्वीकारण्याची कारणे, रुग्णांच्या आयुर्वेदाकडून अपेक्षा जाणून घेतल्या

  • रसायू थेरपीने रुग्णांच्या आरोग्याची स्थिती सुधारल्याचे दिसले

  • कर्करोगाच्या विरोधात रुग्णाने दिलेल्या लढाईत समाधानकारक परिणाम नोंदविले

  • आधुनिक उपचारपद्धतींमधून रुग्णांच्या गरजा पूर्ण होत नसल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले

  • शारीरिक, भावनिक आणि मानसिक पैलूंवर आधुनिक उपचारांचा थेट दुष्परिणाम होतो, तो कमी करण्यासाठी आयुर्वेदातील रसायन उपचाराचा वापर केला

भारतातील सुमारे ८० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे कर्करोगाच्या प्रगत अवस्थेमध्येच निदान होते. रुग्णांमध्ये आधुनिक उपचार पद्धतींना प्रतिसाद न दिलेले अथवा उपचार चालू असताना आयुष्याची गुणवत्ता ढासळलेले रुग्ण जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी चांगल्या पर्यायांच्या शोधात असतात. अशा रुग्णांमध्ये आयुष्याची गुणवत्ता हे उपचारातील सर्वांत मोठे आव्हान असते. रसायन चिकित्सेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रुग्ण केंद्रित चिकित्सेने कर्करोगाची पुढील प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करून रुग्णाचे जीवनमान सुधारणे हे असते.

- वैद्य योगेश बेंडाळे, रसायू कॅन्सर क्लिनिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: ''दरी मिटवायची..? दिवाळीच्या फराळाएवढं हे सोपं नाही'', पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर हाके काय म्हणाले?

Pune News : ट्रस्टच्या जागेत जैन मंदिरच! धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सह आयुक्तांनी सादर केला अहवाल

Nilesh Ghaywal : नीलेश घायवळच्या प्रत्यार्पणासाठी ब्रिटनमधील उच्चायुक्तांशी केला पत्रव्यवहार

8th pay commission: जेवढा उशीर तेवढा फायदा! एकरकमी मिळणार 6,00,000 रुपये, किती असेल फिटमेंट फॅक्टर?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT