अर्कशाळेच्या औषधविक्री केंद्राचे उद्घाटन
सातारा, ता. ३० : आयुर्वेदीय अर्कशाळेच्या नूतनीकरण केलेल्या निरामय औषधे विक्री केंद्र व ओपीडीचे उद्घाटन नुकतेच ज्येष्ठ वैद्य डॉ. मोहन तांबे व नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कंपनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप पटवर्धन, संचालक डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. बोधे, प्रसन्न गोखले व कंपनीचे अधिकारी व सेवक-सेविका उपस्थित होत्या.
यंदाचे वर्ष संस्थेच्या स्थापनेचे शतकमहोत्सवी वर्ष आहे. यावेळी डॉ. तांबे व नगराध्यक्ष मोहिते यांनी संस्थेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अर्कशाळेसारख्या संस्था सातारानगरीचे भूषण आहेत, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष मोहिते यांनी काढले.
अर्कशाळेची उत्पादने दर्जेदार व गुणकारी असल्याचा अनुभव डॉ. तांबे यांनी सांगितला. नवीन उत्पादने बाजारात आणून अर्कशाळेने आपला विस्तार आणखी वाढवावा व उत्पादनांची निर्यात करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
नगराध्यक्ष या नात्याने अर्कशालेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष मोहिते यांनी दिले. डॉ. दिलीप पटवर्धन यांनी शतकमहोत्सवी वर्षात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले. सातारा शहराची माजी नगराध्यक्ष व अर्कशाळेचे संचालक डॉ. अच्युत गोडबोले यांनी आभार मानले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.
-------------------------
62614
सातारा ः आयुर्वेदीय अर्कशाळेच्या निरामय औषधे विक्री केंद्राचे उद्घाटन करताना डॉ. मोहन तांबे व अमोल मोहिते. त्या वेळी डॉ. दिलीप पटवर्धन, डॉ. अच्युत गोडबोले, डॉ. बोधे, प्रसन्न गोखले आदी.
-------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.