Garden 
पुणे

दुरवस्था झालेल्या उद्यानांमध्ये अभ्यास सहली

आशा साळवी

पिंपरी - महापालिकेच्या वतीने विकसित केलेल्या पर्यावरण संस्कार आणि आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांमध्ये तब्बल एक कोटी रुपये खर्च करून महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहली काढण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात या उद्यानांची दुरवस्था झाली असून, या सहलीद्वारे विद्यार्थी नेमका कशाचा अभ्यास करणार आहेत, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागामार्फत विविध प्रकारची वैविध्यपूर्ण अशी १७८ उद्याने आहेत. त्यापैकी एमआयडीसी ‘टी’ आणि चिखली ‘एफ’ ब्लॉकमध्ये एकेक पर्यावरण संस्कार उद्यान व आयुर्वेदिक वनऔषधी उद्यान विकसित केले आहे. या उद्यानांतील पर्यावरणविषयक बाबींची जनजागृती व्हावी, या उद्देशाने २०१९-२० या शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या पाचवी ते नववी आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी कोथरूड येथील निसर्ग जागर प्रतिष्ठान या संस्थेमार्फत सहली काढण्यात येणार आहेत. महापालिका शाळांमधील सर्वच विद्यार्थ्यांना या पर्यावरण संस्कार उद्यान व आयुर्वेदिक वनऔषधी उद्यानांची माहिती दिली जाणार आहे. हा सदस्य प्रस्ताव असल्याने स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. परंतु, दुसरीकडे या उद्यानांची दुरवस्था पाहता विद्यार्थ्यांना नेमकी कशाची माहिती दिली जाणार आहे, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

कोट्यवधी रुपये खर्चून सहली काढण्याऐवजी या दोन उद्यानांची निगा राखण्यावर खर्च करावा, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्याच संस्थेमार्फत ५० लाख रुपये खर्च करून उद्यानांमध्ये पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी, या उद्देशाने वेगवेगळ्या आकारांचे फलक लावण्यात येणार आहेत. अशा सहलीमधून विद्यार्थ्यांना काहीच फायदा होणार नसल्याने काही सामाजिक संस्थांनी आक्षेप घेतला आहे. केवळ लोकप्रतिनिधी, पालिकाधिकारी व ठेकेदार यांचे आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा खटाटोप असल्याचा आरोप साद प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल कोल्हटकर यांनी केला आहे. याविषयी निवेदन त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.

दरम्यान, या नियोजित सहलीविषयी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पराग मुंढे अनभिज्ञ आहेत. अशा प्रकारचा कुठलाच प्रस्ताव माझ्याकडे आला नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुलांना झाडांची माहिती होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. सदस्य प्रस्ताव असल्याने स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. नव्या शैक्षणिक वर्षापासून सहली काढण्यात येतील.
- प्रकाश गायकवाड, उद्यान अधीक्षक, वृक्षसंवर्धन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT