पुणे

‘जनआरोग्य’ योजनेंतर्गत उपचारांची व्याप्ती वाढवणार

CD

नवी दिल्ली, ता. १८ (पीटीआय) : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत (एबी-पीएमजेएवाय) सरकारी रुग्णालयांसाठी उपचारांची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार, आरोग्य लाभ पॅकेजची संख्या सध्याच्या २३ वरून ११२ पर्यंत वाढविण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (एनएचए) सूत्रांनी दिली.
या प्रस्तावित विस्तारामध्ये प्रामुख्याने सामान्यपणे आढळणाऱ्या आणि सरकारी आरोग्य सुविधांमध्ये प्रभावीपणे उपचार करता येऊ शकणाऱ्या आजारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. विशेषतः सामुदायिक आरोग्य केंद्रे (सीएचसी) आणि उपविभागीय रुग्णालयांमध्ये (एसडीएच) हे उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.
या निर्णयामागे दोन प्रमुख उद्दिष्टे आहेत. लाभार्थ्यांना नेहमी आवश्यक असणाऱ्या आरोग्य सेवा त्यांच्या जवळ उपलब्ध करून देणे आणि सध्याच्या पायाभूत सुविधांचा अधिक वापर करून तसेच अतिरिक्त आर्थिक संसाधने उपलब्ध करून सरकारी रुग्णालये सक्षम करणे, ही ती उद्दिष्टे आहेत.

‘एनएचए’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, यापैकी अनेक उपचार सरकारी रुग्णालयांमध्ये आधीपासून उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा, उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने करता येऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने सामान्यपणे आवश्यक असलेल्या वैद्यकीय आणि शस्त्रक्रियेसंबंधी उपचारांचा समावेश असलेली आणखी ८९ पॅकेज निश्चित केली आहेत. त्यामुळे प्रस्तावित आरोग्य लाभ पॅकेजची एकूण संख्या ११२ होणार आहे. (पीटीआय)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT