पुणे

नाकाबंदीत पोलिसांना बारामतीत धक्काबुक्की

CD

बारामती, ता. १७ : शहरातील तिरंगा चौकात नाकाबंदी दरम्यान पोलिसांना धक्काबुक्की व सुरक्षा रक्षकास मारहाण करून अज्ञात दुचाकीस्वार पसार झाला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात या संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुभाष काळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
मंगळवारी (ता. १२) सायंकाळी तिरंगा चौक येथे वाहतूक शाखा व शहर पोलिसांकडून संयुक्त नाकाबंदी सुरू होती. यावेळी विना नंबर प्लेटची काळी युनिकॉर्न दुचाकी संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन अडवून ई-चलानद्वारे कारवाई सुरू केली असता, चालकाने दुचाकी पळवण्याचा प्रयत्न केला. पुनावाला गार्डनसमोर ताबा सुटल्याने तो खाली पडला. पोलिस व सुरक्षा रक्षक केशव मोरे यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने शिवीगाळ व धक्काबुक्की करत पलायन केले. पोलिसांनी त्याची दुचाकी (एमएच ४२ बीव्ही ८८०५) जप्त केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil: हपकिनच्या कामकाजाबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, तुकाराम मुंडे यांच्याकडेच पदभार ठेवा: वळसे पाटील यांची विधिमंडळात मागणी

Mumbai News: रेल्वेचे दावे कोरडे, डबे मात्र ओले! लोकलच्या छतातून पाण्याचा वर्षाव; रेल्वे प्रशासनावर टीकेचा भडिमार

आधी गाडण्याची तयारी केली, नंतर पतीची हत्या; ४५ दिवसांनी पत्नीचं कांड समोर

Latest Marathi Live Update: विकेंडला रायगडला जाणार आहात? देवकुंड, ताम्हाणीसह अनेक पर्यटनस्थळांवर लागू झाले कडक निर्बंध

Malvan Teacher Transfer : मालवणमध्ये 5 दिवसांपासून शाळा बंद! चांगल्या शिक्षकाच्या बदलीने पालक संतापले; 'त्या' शिक्षकाला परत रुजू न केल्यास दाखले काढून घेण्याचा इशारा

SCROLL FOR NEXT