barti organisation Sakal
पुणे

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या व्यक्तिमत्व चाचणीसाठी बार्टीतर्फे प्रशिक्षण

व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संस्थेमार्फत संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी २०२१ साठी पात्र उमेदवारांना आर्थिक साहाय्य व ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टी संस्थेमार्फत करण्यात आले आहे.

बार्टी संस्थेने यू.पी.एस.सी. नागरी सेवा परीक्षा २०२० च्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेच्या तयारीसाठी ऑनलाईन पद्धतीने मार्गदर्शन दिले होते. ऑनलाईन मार्गदर्शनाच्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे उमेदवारांना मुलाखतीमध्ये चांगले यश मिळाले. उपक्रमात सहभागी २३ उमेदवारांपैकी १० उमेदवारांना यू.पी.एस.सी. परीक्षेत यश प्राप्त झाले. यावर्षीही सनदी अधिकारी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक यांच्याकडून व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.

बार्टीमार्फत संघ लोकसेवा आयोग- नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी २०२१ साठी उमेदवारांना एकरकमी २५ हजार रूपयाचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती ऑनलाईन अर्ज बार्टी संस्थेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी http://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यवी, असे आवाहनही बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: हैदराबादचा राजस्थानवर दणदणीत विजय! ईशान-अभिषेकच्या खेळीनं वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ; Points Table मध्ये उलथापालथ

Vaibhav Sooryavanshi: राजस्थान रॉयल्सला धक्का! वैभव शतकानंतर फिल्डिंग करताना लंगडत गेला मैदानातून बाहेर; नेमकं काय घडलं?

Vaibhav Sooryavanshi चे दुसरे शतक! तब्बल १२ षटकारांचा पाऊस पाडत IPL मध्ये ऐतिहासिक कारनामा; १९ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

Launch Service : मुळशी ते वाघवाडी प्रवासी लाँचसेवेचे लोकार्पण; १६ गावांतील ग्रामस्थांना होणार फायदा

SMT Heritage Scare: सीएसएमटी हेरिटेज स्थानकात ‘पॅरानॉर्मल’ कोड, गूढ चिन्हांनी खळबळ; काळी जादू, सुरक्षा आणि वारसा संरक्षणावर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT