babasaheb purandare mns raj thackeray 
पुणे

''बाबासाहेबांनी सांगितलेला इतिहासातील प्रसंग डोक्यात फिट होतो''

सकाळ वृत्तसेवा

बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारपासून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज बाबासाहेबांच्या 'ओंजळ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुणे- शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारपासून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज बाबासाहेबांच्या 'ओंजळ' या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध गायिका आशा भोसले, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते आशिष शेलार उपस्थित होते. यावेळी बाबासाहेबांच्या सत्कार कार्यक्रमात राज ठाकरे म्हणाले की, 'मी सहा वर्षाचा असताना बाबासाहेबांना पहिल्यांदा पाहिलं होतं. त्यांना पाहत होतो, वाचत होतो. त्यानंतर माझ्या नशिबाने मी त्यांना भेटू शकलो. त्यांच्या सहवासात राहू शकलो. महाराजांची भूमिका बाबासाहेबांनी पार पाडलेली मी पाहिलं आहे. मी भाग्यवान आहे.'

बाबासाहेबांना खूपदा भेटलोय. इतिहासाचे अनेक प्रश्न त्यांच्याकडून समजून घेतले. शिवचरित्रात मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे, ते इतिहास सांगत असले तरी वर्तमानात कसं भानावर यावं ते सांगत असतात. इतिहासातून काय चुका करु नये हे ते सांगत असतात. इतिहासाचा आणि वर्तमानाचा संबंध असावा. नुसताच इतिहास ऐकल्यास रुक्ष वाटतो. पण, बाबासाहेब जसा प्रसंग सागतात तो इतिहासाचा क्षण डोक्याट फिट होते, असं ठाकरे म्हणाले.

इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारे बाबासाहेब महापुरुष आहेत. शिवचरित्र इतिहास म्हणून वाचण्याचा काही अर्थ नाही. बाबासाहेब इतिहासातून काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तो समजून घेतला नाही तर फक्त इतिहास राहतो. बाबासाहेबांच्या घरी तळघरात ते एकटे बसले होते. तेथे जुनी हजारो तलवारी होत्या. बाबासाहेब ते घेऊन साफ करत बसले होते. त्यावर काही छिद्रे होती. एका छिद्राचा अर्थ १०० माणसे मारली. ते सर्व पाहून मला अभिमान वाटला. बाबासाहेब समजेल, रुचेल अशाप्रकारे इतिहास ते सांगत असतात, असं ते म्हणाले.

बाबासाहेबांनी कधी इतिहासाला सोडलं नाही. त्यांनी दंतकथेला वाव दिला नाही. पण, प्रसंग सांगताना त्यांनी अलंकारिक भाषा वापरली म्हणून ती आपल्याला निटपणे समजू शकली. देवगिरी किल्ल्यात मुघलांना शिरण्यात किती कठीण होतं हे सांगतात बाबासाहेब सांगतात रावणाला शितेच्या हृदयात शिरणं जितकं कठीण होतं तितकं मुघलांना ते कठीण होतं. गोष्टी पक्की करण्यासाठी ते हे करत असतात. आमचे नातवंडं-पतवडं तुमच्याकडूनच इतिहास शिकत राहतील इतकं आयुष्य तुम्हाला मिळो अशी मी इश्वर चरणी प्रार्थना करतो, अशा शुभेच्छा राज ठाकरे यांनी दिल्या.

आशिष शेलार काय म्हणाले?

बाबासाहेबांचे कौतुक करावे तितके कमी आहे. त्यांचा एक गुण मला खूप आवडतो. तो म्हणजे सहनशीलता आणि दुसऱ्याला क्षमा करण्याचा स्वभाव. मला कोणत्याही वादात जायचं नाही. पण, तुमच्या लेखनावर काही नतदृष्टांनी सपासप वार केले, भीम प्रहार केले पण तुम्ही काही न बोलता सहन करुन दाखवलं. बाबासाहेबांनी आदर्श जीवन जगलं. त्यांच्याकडून जितकी प्रेरणा घ्यावी तितकी कमी आहे. काहीजण अजातशत्रू असतात, तसे बाबासाहेब आहेत. त्यांनी शिवचरित्रासाठी आपला जीवन वाहून घेतलं आहे. ऋषीतुल्य असं व्यक्तीमत्व बाबासाहेबांचे आहे, असं भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

IND vs WI, 2nd ODI: दुसऱ्या सामन्यापूर्वीच मोठी बातमी! पहिल्या वनडेत शतक केलेला खेळाडू संघातून बाहेर, कारण काय?

'जैसे तू है पास मेरे तेरे पास मे' योगिता चव्हाणचा डान्स पाहिलात का? स्टेप्स आणि एक्सप्रेशन पाहून नेटकरी म्हणाले...Viral Video

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

SCROLL FOR NEXT