पळसदेव, ता. ३ ः रुई (ता. इंदापूर) येथील श्री बाबीर देवाची यात्रा शुक्रवारी (ता. ६) भरणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी दिली. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. येथील बाबीर देवाची वर्षात दोन वेळेस भरते. यापैकी दिवाळी पाडव्याला सुरु होणारी व तीन दिवस चालणारी यात्रा ही प्रमुख यात्रा असते. दिवाळीच्या धामधुमीत ज्या भाविकांना देव दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी येथे येणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी माघ पौर्णिमेनंतर भरणारी ही यात्रा महत्त्वाची असते. या यात्रेनिमित्त पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर, नाशिक या जिल्ह्यांतून हजारो भाविक येथे उपस्थिती लावतात. शुक्रवारी यात्रेनिमित्त सकाळी देवाची महापूजा व अभिषेक केला जाईल. यानंतर मानाचा पोशाख व मुकूट बसविण्यात येईल. दरम्यान, फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत देवाच्या पालखीची गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे. यानंतर पालखी मंदिराकडे प्रस्थान करेल. पालखी मंदिरात दाखल झाल्यानंतर बाबीर देवाचा जयजयकार आणि नवसपूर्तीच्या कार्यक्रमास सुरुवात होईल. शनिवारी (ता. ७) भाकणूकीच्या कार्यक्रमाने यात्रेची सांगता होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.