पुणे

1 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी पर्यंतचे ऊस बील जमा ; 10 फेब्रुवारी अखेर ऊस बिलाची 596 कोटी 22 लाख - संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे

CD

बबनराव शिंदे यांचा फोटो

शिंदे कारखान्याकडून फेब्रुवारीचे ३०२५ प्रमाणे बिल जमा

टेंभुर्णी, ता. १९ : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब या कारखान्याचे १ ते १० फेब्रुवारी या दहा दिवसांचे प्रतिटन ३०२५ रुपयांप्रमाणे पहिला हप्ता ऊस बिल सभासद ऊस पुरवठादार यांचे बँक खात्यात जमा करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली.

माजी आमदार बबनराव शिंदे म्हणाले, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर १ पिंपळनेर व युनिट नंबर २ करकंब या कारखान्याचा सन २०२५-२६ चा गाळप हंगाम जोमाने सुरू आहे. या हंगामात युनिट नंबर १ कडे सरासरी प्रतिदिन १४,७०० मे.टन व युनिट नंबर २ कडे सरासरी ५००० मे.टनपेक्षा जादा गाळप होत आहे. आजअखेर युनिट नंबर १ कडे १५ लाख ४० हजार १६३ मे.टन व युनिट नंबर २ कडे ५ लाख २४ हजार ४५१ मे.टन असे एकूण २० लाख ६४ हजार ६१४ मे.टन गाळप झाले आहे.
१०फेब्रुवारी अखेर ऊस बिलासाठी एकूण ५९६ कोटी २२ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत.
युनिट नंबर १ व २ कडील सन२०२५-२६ गाळप हंगामातील गाळपाचे उद्दिष्टपूर्तीसाठी सभासद व ऊस पुरवठादारांनी त्यांचा सर्व ऊस विठ्ठलराव शिंदे कारखान्यास पुरवठा करून गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन माजी आमदार बबनराव शिंदे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune fire news: क्षणात संसार राख झाला! हडपसरमध्ये मध्यरात्री आग, १९ झोपड्या खाक, कामगार कुटुंबांचे मोठे नुकसान

आजचे राशिभविष्य - 21 फेब्रुवारी 2026

अग्रलेख : राजघराण्याच्या वलयाला ग्रहण

Hoili 2026 : होळीसाठी मथुरा-वृंदावनला जाताय? मग तारखा नीट तपासा! यंदा 'या' दिवशी खेळली जाणार रंगपंचमी; ४० दिवस चालणार उत्सव

Panchang 21 February 2026: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT