पुणे

बाबू गेनू यांची छायाचित्रे पुन्हा स्मारकात बसविणार - शिवाजीराव आढळराव पाटील

सकाळवृत्तसेवा

महाळुंगे पडवळ - येथील हुतात्मा बाबू गेनू स्मारकातील हटविलेली दुर्मीळ छायाचित्रे पुन्हा दहा दिवसांत बसविण्याचे आश्‍वासन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिल्यामुळे उपोषण मागे घेत असल्याचे बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी सांगितले.

महाळुंगे पडवळ येथे हुतात्मा बाबू गेनू यांचे स्मारक आहे. या स्मारकामध्ये हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानमार्फत हुतात्मा बाबू गेनू यांच्या दुर्मीळ माहिती असणाऱ्या फ्रेम तहसीलदारांच्या परवानगीने लावल्या होत्या. मात्र, तहसीलदारांनी त्या तत्काळ येऊन काढून टाकल्या. त्याच्या निषेधार्थ बाबाजी चासकर, हुतात्मा बाबू गेनू सैद यांचे पुतणे बबनराव सैद, प्रा. वसंत भालेराव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले होते. अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला होता.

दरम्यान, आढळराव पाटील यांनी बाबाजी चासकर व अन्य उपोषणकर्त्यांची म्हाळुंगे पडवळ येथे जाऊन भेट घेऊन त्यांचे प्रश्न समजून घेतले. तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून सदर प्रश्‍न सोडविणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

Dr. Ratnakar Mahajan Pass Away: ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. रत्नाकर महाजन यांचे निधन; महाराष्ट्रातील पुरोगामी, वैचारिक चळवळीतील अभ्यासू आवाज हरपला

Marathi News Live Updates: स्वच्छता साहित्यासाठी डीबीटी अशक्य, स्थायी समितीसमोर फेरप्रस्ताव

Karad Chain Snatching: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर ‘जॅक’ पडला भारी; कऱ्हाडमध्ये उसातून शोधला सोनसाखळी चोर, श्वानाने काढला माग

SCROLL FOR NEXT