पुणे

लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखानाचा गळीत हंगाम सुरू चा बातमी पेंडींग राहू नये हि विनंतीर लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

CD

ANR26B03147
अनगर : लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी गव्हाणीत उसाची मोळी टाकताना अध्यक्ष विक्रांत पाटील.

पाटील कारखान्याचे ४ लाख मे. टनाचे उद्दिष्ट
दुष्काळातही गळीत हंगाम सुरू; इतर कारखान्यांप्रमाणे दर देण्याची ग्वाही

सकाळ वृत्तसेवा
अनगर, ता. १२ : येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामाचा शुभारंभ सोमवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता करण्यात आला. यंदा चार लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या कारखान्यात प्रारंभी अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते विधिवत सत्यनारायण पूजा करण्यात आली. वेदशास्त्रसंपन्न बाजीराव जोशी यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर अध्यक्ष विक्रांत पाटील, शेतकरी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत उसाची पहिली मोळी गव्हाणीत टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.

शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य
दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून कारखाना सुरू करण्यात आला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना इतर कारखान्यांच्या बरोबरीने दर देण्यात येईल, अशी ग्वाही अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी यावेळी दिली. चालू गळीत हंगामासाठी कारखान्याची यंत्रणा सज्ज झाली आहे. ऊस वाहतुकीसाठी ११० वाहने, १७५ डंपिंग वाहने, २५० बैलगाड्या आणि २४ हार्वेस्टर यांच्याशी करार करण्यात आला आहे, अशी माहिती कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे यांनी दिली. या वेळी प्रकाश चवरे, हनुमंत पोटरे, सतीश भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश जोगदे यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT