supriya sule and eknath shinde sakal
पुणे

MP Supriya Sule : खटला चालवून आरोपीला फाशी दिली असती तर पहिला पेढा मी मुख्यमंत्र्यांना दिला असता

बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरची चौकशीची मागणी.

सकाळ वृत्तसेवा

काटेवाडी - बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काऊंटरची चौकशी व्हायला हवी. खरे तर या गुन्ह्याचा तपास फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवून भर चौकात आरोपीला फाशी द्यायला हवी होती. त्यातून समाजामध्ये एक योग्य संदेश गेला असता. मात्र या एन्काऊंटरने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी महाराष्ट्रामध्ये एन्काऊंटर हा शब्द मी कधी ऐकला नव्हता.

जेव्हा जेव्हा फडणवीस गृहमंत्री होतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातील गुन्हेगारीमध्ये वाढ होते हा मीडिया रिपोर्ट आहे. फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा दिली असती तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता, अशा शब्दात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर तोफ डागली.

बारामती येथे पक्ष कार्यालयात खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषद मंगळवारी (ता. २४) पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. खासदार सुळे पुढे म्हणाल्या, बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्याचे दोन्ही हात बांधलेले दिसतात. तसेच त्याच्या चेहऱ्यावर काळे कापड देखील बांधले आहे.

असे असताना आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकवली कशी? असा प्रश्न त्यातून निर्माण होतो. या एन्काऊंटरने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. या प्रकरणाची वेळेत एफ आय आर झाली नव्हती. ती का झाली नाही याची देखील चौकशी व्हायला हवी. राज्यामध्ये महागाई, बेरोजगारी, आरक्षणाचे प्रश्न या सगळ्यांवर राज्य सरकारला उत्तरे द्यावी लागणार आहेत.

हे सरकार सध्या पॅनिक मोडमध्ये आहे. त्यामुळे आपण गतिमान आहोत हे दाखवण्यासाठी वेगवेगळे निर्णय झटपट घेण्याची घाई त्यांना झाली आहे. मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या सर्व समाजाची फसवणूक या सरकारने केली आहे. राज्यातील सध्याच्या अराजकतेला हे ट्रिपल इंजिनचे खोके सरकार जबाबदार आहे, अशा तीव्र शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली.

भिगवन चौकातील अपघात टाळण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची मदत.....

तत्पूर्वी आज खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकारी महेश रोकडे यांची भेट घेतली. याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, बारामती मध्ये ट्राफिक प्रचंड वाढले आहे. बारामतीतील भिगवन चौकामध्ये वाहतूक कोंडी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याबाबत केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची मी मदत घेतली. बारामती लोकसभा मतदारसंघातील जे ब्लॅक स्पॉट आहेत.

त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही मदत घेण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बारामतीतील भिगवण चौकात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या विभागाशी संबंधित असणारी सेव्ह लाईफ नावाची एक स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने येथील आराखडे व भिगवण चौकाचे एरियल शूटिंग केले आहे. तीन ते चार आठवड्यात येथील समस्येवर ते आपल्याला उपायोजना सुचवणार आहेत. तसेच येथील आराखडा चुकला असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

आंबेडकर वसाहतीतील लाभार्थ्यांना अद्याप घराच्या चाव्या नाहीत....

त्याच पद्धतीने नीरा डावा कालव्याचे सुशोभीकरण बारामती शहरात झाले आहे. हे सुशोभीकरण अतिशय चांगले झाले असले तरी या कालव्याच्या बाजूने सुरक्षारक्षक जाळ्या उभ्या केल्या नाहीत. त्यामुळे येथे अपघाताचा धोका आहे. तसेच याचे सेफ्टी ऑडिट देखील झाले नाही. त्याबाबतचे पत्र मी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे. तीन हत्ती चौक ते पेन्सिल चौक या रस्त्याच्या देखील वारंवार दुरुस्तीची कामे सुरू असतात.

त्यामुळे या कामाची नेमकी तारीख किती आहे. वारंवार येथील कामे का केली जातात याबाबत देखील मी माहिती घेत आहे. तसेच बारामती मधील आधुनिक मच्छी बाजारातील तांत्रिक समस्यांवर देखील उपाययोजना करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीचे सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. मात्र अद्यापही लाभार्थ्यांच्या हातात घराच्या चाव्या दिल्या गेल्या नाहीत. हा प्रकल्प राज्य सरकारचा आहे. या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काची घरे लवकरात लवकर मिळावीत यासाठी संबंधित विभागाकडे प्रयत्न सुरू असल्याचे खासदार सुळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Candidate Expenditure Limit : राज्य निवडणूक आयोगाने नगपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांची खर्च मर्यादा वाढवली!

Talegaon Dabhade : गिरीश दापकेकर तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नवे मुख्याधिकारी

Horoscope Prediction: कठोर परिश्रमाचे फळ मिळणार अन्...; 2026 मध्ये पाच राशींचे भाग्य बदलणार,वाचा सविस्तर

Pune News: शंकर महाराज अंगात येतात अन् १४ कोटी रुपयांचां गंडा... पुण्यात काय घडलं? धक्कादायक प्रकार समोर

Latest Marathi News Live Update : जुन्नर मधील बिबट्या शिफ्ट करणार वनमंत्र्यांनी दिले परवानगी

SCROLL FOR NEXT