Case File Sakal
पुणे

बघतोय रिक्षावाला संघटनेच्या आंदोलनकर्त्या 190 जणांवर गुन्हा दाखल

बाईक टॅक्सी सेवा व त्याबाबतचे अ‍ॅप कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी बघतोय रिक्षावाला संघटनेकडून गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खासगी कंपन्यांच्या बाईक टॅक्सी बंद कारण्याच्या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर (आरटीओ) आंदोलन करणार्‍या 'बघतोय रिक्षावाला' संघटनेच्या १९० कार्यकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

आंदोलनकर्त्यांनी सामाजिक अंतर न पाळता विनामास्क आंदोलन करुन शासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केला, असे याबाबतच्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

शहरात सुरु असलेली बाईक टॅक्सी सेवा व त्याबाबतचे अ‍ॅप कायमस्वरूपी बंद करावे, या मागणीसाठी बघतोय रिक्षावाला संघटनेकडून गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे आरटीओ चौकातून जहांगीर हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडवून वाहतूकीस अडथळा निर्माण झाला होता.

बाईक टॅक्सी सेवेचा विरोध करण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर व पदाधिकाऱ्यानी विनापरवाना लाऊड स्पिकर लावून त्यावरुन भाषणे करुन मोठमोठ्या घोषणाबाजी करुन रुबी हॉल, जहांगीर हॉस्पिटल, एन.एम. वाडिया हॉस्पिटल या रुग्णालयांकडे जाणारा महत्वाचा रस्ता अडविल्याने रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने रुग्णांच्या जिवीतास धोका होऊ शकतो.

तरीही आंदोलनकर्त्यांनी रस्ता अडवून नागरिकांची गैरसोय केल्याचा आरोप या कार्यकर्त्यांविरुद्ध ठेवण्यात आला आहे. आंदोलनाच्या वेळी त्यांनी सामाजिक अंतर न पाळता विनामास्क आंदोलन करुन शासकीय अधिकार्‍यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता अवमान केला, असे फिर्यादीमध्ये नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT