Bajar Samiti Pune Sakal
पुणे

Bajar Samiti Pune : पुणे बाजार समिती; संचालक मंडळाच्या बैठकीचा निर्णय पुन्हा सचिवांच्या कोर्टात

आठ दिवसात निर्णय घेण्याचा आदेश; सह्यांच्या अधिकाराचे प्रकरण पुन्हा पणन संचालकडे जाण्याची शक्यता

प्रवीण डोके @pravindoke007

पुणे : पुणे बाजार समिती सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याबाबच्या संचालक मंडळाच्या बैठकीचा निर्णय पुन्हा सचिवांच्या कोर्टात गेला आहे. राज्याच्या पणन संचालकांनी कायद्यातील बाजार समितीच्या मंजूर उपविधीनुसार संचालक मंडळाची सभा बोलविण्याच्या निर्णय आठ दिवसांत घेण्याचा आदेश सचिवांना दिला आहे.

तसेच संचालक मंडळाची बैठक झाल्यानंतर अपील करण्याची संधी असल्याने सह्यांच्या अधिकाराचे प्रकरण पुन्हा पणन संचालकडे जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी बाजार समितीमध्ये पंचवार्षिक निवडणुका होऊन संचालक मंडळ अस्तित्वात आले.

त्यानंतर वर्षभरातच दोन गट पडले आहेत. यातील एका गटाने पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती महत्त्वाच्या विषयांबाबत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप केला आहे. याच अनुषंगाने दहा संचालकांनी बाजार समितीच्या सचिवांना पत्र देवून सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्यासाठी संचालक मंडळाची तातडीने बैठक घेण्याची मागणी केली होती.

त्या अनुषंगाने सचिवांनी बैठक बोलवली होती. परंतु या बैठकीला राज्याचे पणन संचालक विकास रसाळ यांनी स्थगिती दिली होती. ही स्थगिती उठविल्याने बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता लक्ष लागले आहे.

सचिवांनी बोलवलेली संचालक मंडळाची बैठक कायद्यास अनुसरून नसून याविरुद्ध बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, संचालक सुदर्शन चौधरी यांनी राज्याच्या पणन संचालकांडे ५२ बी मध्ये अपील दाखल केले होते.

पणन संचालकांचे निरीक्षण

सभापतीचे सह्यांचे अधिकार काढून घेण्याबाबतची संचालक मंडळाची सभा अद्याप झालेली नाही. त्यामुळे अर्जदार यांनी उपस्थित केलेले मुद्यांवर सद्यस्थितीत भाष्य करणे योग्य होणार नाही.

अर्जदार यांना सदर मुद्यांवर संचालक मंडळाची सभा झाल्यानंतर अपिलाद्वारे दाद मागण्याची संधी उपलब्ध आहे. तसेच या सभेची तारीख ७ जून उलटून गेलेली आहे. त्यामुळे प्रतिवादी सचिव यांना ४ जून रोजीच्या अर्जावर निर्णय घेण्याची मुभा आहे.

या संचालकांनी केली मागणी

उपसभापती सारिका हरगुडे, मनिषा हरपळे, नितीन दांगट, प्रशांत काळभोर, दत्तात्रय पायगुडे, शशिकांत गायकवाड, लक्ष्मण केसकर, संतोष नांगरे, अनिरुद्ध भोसले, प्रकाश जगताप यांनी सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्यासाठी संचालक मंडळाची तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.

पणन संचालकांच्या आदेशानुसार सविस्तर अभ्यास केला जाईल. त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल.

- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT