पुणे

खेड तालुक्यात बाजरी जोमात

CD

चाकण, ता. ११ : खेड तालुक्यात यंदाच्या उन्हाळी हंगामात बाजरी पीक जोमात आहे. वळवाच्या पावसाने बाजरीचे नुकसान केले नाही. यामुळे उत्पादन वाढेल, अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
यंदा वेळेवर झालेली पेरणी, उपलब्ध सिंचन सुविधा, अनुकूल हवामानामुळे बाजरीचे पीक सध्या जोमात दिसत आहे.
तालुक्यात उन्हाळी बाजरीचे पीक सुमारे १५५९ हेक्टर क्षेत्रावर आहे. विशेषतः कमी पाण्यात येणारे, कमी खर्चिक पीक म्हणून बाजरीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी असल्याने पीक जोमात असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त करत आहेत.
स्थानिक बाजारात बाजरीला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
खेड तालुक्यात बाजरीचे पीक समाधानकारक आहे. त्यामुळे उत्पादनही चांगले निघेल. दरवर्षी क्षेत्रात वाढ होत आहे, असे खेड तालुका कृषी अधिकारी वैभव विश्वे यांनी सांगितले.


10557

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एल निनोचं रौद्ररूप येणार? शंभर वर्षांतील शक्तिशाली घटनांपैकी एक ठरण्याचा अंदाज, भारतासह जगाची चिंता वाढली

Marathi News Live Updates : मी पुण्यात भाषण द्यायला नाही, तुमचं म्हणणं ऐकायला आलो आहे- राहुल गांधी

नवीन SIM घेणाऱ्यांसाठी मोठा बदल! फक्त KYC पुरेसं नाही, बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य

Kalamb News : मतदारांनी विरोधक निवडले; नगरसेवकांनी सत्ता! कळंबमध्ये बॅनरबाजीने राजकीय धुरळा

ST Service : ठाणे-गणपतीपुळे एसटीमुळे १४ गावांना दिलासा; आमदार संजय केळकरांच्या पाठपुरावयाला यश

SCROLL FOR NEXT