बाजरीचे पीक फुलोऱ्यात
पेरणीच्या वेळी पावसाने दांडी मारल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता
राहू, ता. दौंड ः तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आणि राहू बेट परिसरामध्ये बाजरी पेरणीच्या वेळी पुरेसा व समाधानकारक पाऊस न झाल्याने बागायती पट्ट्यात आणि नदीकाठच्या परिसरात शेतकऱ्यांनी बोटावर मोजण्याइतक्या क्षेत्रावरच बाजरीची पेरणी केली. पावसाअभावी बाजरीच्या उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः जून व जुलै महिन्यात बाजरीची पेरणी केली जाते. बाजरी पिकाला पोषक वातावरण मिळाल्याने बागायती पट्ट्यात मोजक्याच ठिकाणी पीक आहे. बाजरीच्या कणसांमध्ये सध्या दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे.
पाखरांपासून बचाव होण्यासाठी बाजरी पिकाच्या चारही बाजूंनी विविध रंगबेरंगी, थरथर आवाज करणारे प्लॅस्टिकचे कागद तसेच पुरुषांची प्रतिकृती (बुजगावणी) लावण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला बाजरी काढणीला सुरुवात होईल. एक एकर क्षेत्रामध्ये सरासरी सोळा ते अठरा पोती म्हणजे सरासरी दोन टनांपर्यंत बाजरीचे उत्पादन मिळेल, असा अंदाज येथील शेतकरी पांडुरंग टेंगले, दादासाहेब टेंगले यांनी सांगितले.
कोट
दौंड तालुक्यात चार हजार ३३ हेक्टर क्षेत्रावर बाजरीची पेरणी झाली आहे. शेतकऱ्यांना खात्रीशीर व गुणवत्तेचे दर्जेदार बियाणे मिळाले आहे. मात्र, पावसाचे प्रमाण कमी असल्याने बाजरी पिकाला लष्करी अळी व हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाअभावी बाजरीच्या उत्पादनात काहीशी घट होण्याची शक्यता आहे.
– अजिंक्य दूधाणे, दौंड तालुका कृषी अधिकारी
कोट
अवकाळी पाऊस मार्च, एप्रिल महिन्यात झाला. मात्र, बाजरी पेरणीच्या वेळेस पावसाने दांडी मारल्याने बागायती पट्ट्यात बाजरीची पिके बोटावर मोजण्याइतकीच आहेत. बाजरी उत्पादनात घट होणार असल्याने बाजरीला चांगला बाजारभाव मिळेल.
– अशोक खोरकर, बाजरी उत्पादक शेतकरी, राहू (ता. दौंड)
फोटो :
राहू, ता. दौंड : येथील परिसरात बाजरीचे पीक फुलोऱ्यात आले असून, कणसांमध्ये दाणे भरण्यास सुरुवात झाली आहे. (छायाचित्र : संतोष काळे, राहू, ता. दौंड)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.