पुणे

खंडोबाचीवाडीतील विद्यार्थ्यांनी बालआनंद बाजारातून घेतला व्यवहार ज्ञानाचा धडा

CD

ANR26B02897
खंडोबाचीवाडी (ता. मोहोळ) ः येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरलेल्या बालआनंद बाजारात खरेदी करताना पालक ग्रामस्थ.

खंडोबाच्यावाडीत बालआनंद बाजारात २० हजारांची उलाढाल
अनगर ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाचीवाडी येथील विद्यार्थ्यांनी बाल आनंद बाजारामध्ये २० हजारांची उलाढाल करून खरेदी-विक्रीचा अनुभव घेत आकलनातून व्यवहार ज्ञानाचा धडा घेतला. मनोरंजनातून कृतियुक्त व्यवहार ज्ञान मिळावे या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडोबाचीवाडी शाळेमध्ये बाल आनंद बाजार व फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी शेतातील फळभाज्या पालेभाज्या व विविध फळे तसेच खाऊ गल्ली मध्ये पाणीपुरी, भेळ, समोसा, वडापाव पॅटीस, इडली, पुरी भाजी अशा अनेक पदार्थांचे स्टॉल लावले होते. विद्यार्थी बाजारामध्ये आपले साहित्य विकावे यासाठी वेगवेगळे फंडे वापरून ग्राहकांना आकर्षित होते. पालक व ग्रामस्थांनी या बाल आनंद बाजार मेळाव्याला उत्तम प्रतिसाद देऊन खरेदी केली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवा व त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे यासाठी पालकांनी विद्यार्थ्यांना मदत केली. या बालआनंद बाजारात सुमारे वीस हजार रुपयांची उलाढाल झाली. शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सुरवसे, शहाजान मुलाणी, विकास सरक, अनुराधा नांदवटे दत्तात्रय थोरात व अच्युत ढवण यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १८.६३ कोटींचे अमली पदार्थ भस्मसात

भाजपची राज्यसभेची पहिली यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बिहारमधून उमेदवार, महाराष्ट्रातून कोण कोण?

Dry Fruits Price : युद्धाची झळ सुकामेव्याला! इराण-इस्रायल वादामुळे खजूर आणि बदामाचे दर वाढणार

खेळाडूंकडून ५० लाख दंड वसूल काय करताय, आणखी कठोर कारवाई करा! शाहिद आफ्रिदीने PCB ला दिला सल्ला; म्हणाला, दोन वर्षांसाठी...

Latest Marathi News Live Update : धुळे ग्रामस्थांच्या मदतीने 5 दरोडेखोर गजाआड, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT