पुणे

आमचा किल्ला लय भारी

सकाळवृत्तसेवा

पुणे - सारसबागेसमोरील गरवारे बालभवनमध्ये मुलांनी उभारलेले किल्ले बघायला पालक आणि पाहुणे उत्सुकतेनं जमले होते. किल्ला करण्यासाठी काय काय केलं, हे मुलं त्यांना सांगत होती. त्यांच्याकडून होणाऱ्या कौतुकानं ती आनंदित होत होती.

वरद आणि चिंतन म्हणाले, ‘‘बालभवनमध्ये सगळ्या गटांनी मिळून तीन किल्ले बनवले आहेत. गटामध्ये ताईंनी सगळ्यांशी आधी गप्पा मारल्या. आमच्या आधीच्या मुलांनी किल्ला बनवताना कुठला विचार केला होता, ते कसं नियोजन करायचे, कुठलं साहित्य वापरायचे वगैरे सांगितलं. आम्हाला काय करायला आवडेल ते विचारलं.’’ 

जानकी, आदित्य, मल्हार व अनन्या यांनी सांगितलं, की दोन आठवडे आधी आम्ही किल्ल्याचं काम सुरू केलं. तळाशी पिंपं, त्याच्यावर मोठाले दगड, वरून गोणपाट टाकले. मग चिखलानं वर हवा तसा आकार दिला. रस्ते, दऱ्या, विहिरी, झाडी आणि पाणी दाखवलं. हे करताना भारी वाटलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले कसे तयार करत असतील, याच्यावरची माहिती आम्ही सुटीत वाचायची असं ठरवलं आहे. 

बालभवनमध्ये अनेक मुलांनी मजेदार चित्र काढून शुभेच्छापत्र तयार करायचा गमतीदार कारखानाच जणू उघडला होता. आहान, वेदांग व राधिका म्हणाले, की आम्ही तयार केलेली भेटकार्ड ताई दिवाळी समारंभासाठी बालभवनमध्ये येणाऱ्या पाहुण्यांना देतात. पाहुण्यांनी ‘वाहव्वा’ म्हटलं की आम्हाला सांगतात. सगळ्या ताई आपापल्या गटातल्या मुलांसाठी शुभेच्छापत्र तयार करून त्यावर त्या-त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव लिहून देतात. आम्हाला मिळालेलं शुभेच्छापत्र आम्ही सगळ्यांना दाखवतो. नंतर बुकमार्क म्हणून वापरतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने कोलकाताला दिला दुसरा धक्का; नारायणपाठोपाठ अर्धशतक करणारा सॉल्टही परतला माघारी

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT