पुणे, ता. २३ : पुणे महापालिकेच्या वतीने २०२६ या वर्षाचा ‘बालगंधर्व पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक चंद्रकांत काळे यांना जाहीर झाला आहे. बालगंधर्व यांच्या जयंतीचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २६) दुपारी चार वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिली.
महापालिका प्रशासनाच्या वतीने साहित्य, कला, संस्कृती आणि नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव, प्रशासकीय राजवट आणि विविध निवडणुकांमुळे मागील काही वर्षांपासून या पुरस्कारांचे वितरण झाले नव्हते. यंदाच्या पुरस्कारासोबतच यापूर्वी जाहीर झालेल्या पुरस्कारांचेही वितरण याच सोहळ्यात केले जाणार आहे. ज्येष्ठ कलाकार सुरेश साखवळकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. अभिनय, दिग्दर्शन, निवेदन आणि साहित्य अशा विविध क्षेत्रांतील प्रदीर्घ योगदानाबद्दल काळे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. माजी आमदार उल्हास पवार, माजी उपमहापौर डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी दामले, ज्येष्ठ कलाकार अनुराधा राजहंस यांचा समावेश असलेल्या निवड समितीने ही निवड निश्चित केली आहे.
बालगंधर्व पुरस्कार २०२६ या वर्षातील इतर विभागांमधील पुरस्कार विजेते :
दीप्ती भोगले (संगीत), संदीप चव्हाण (बुकिंग), विनोद रत्ना (दिग्दर्शन), अनुष्का आपटे (संगीत, उदयोन्मुख कलाकार), ओमकार कापसे (पुरुषोत्तम करंडक विजेता २०२५)
बालगंधर्व पुरस्कार (२०२०) :
ज्येष्ठ कलावंत अभिनेत्री निर्मला गोगटे (बालगंधर्व मुख्य पुरस्कार), किरण यज्ञोपवीत (लेखन व दिग्दर्शन), प्रवीण बर्वे (नाट्य व्यवस्थापन), संदीप देशमुख (पडद्यामागील कलाकार), रवींद्र कुलकर्णी (संगीत रंगभूमी योगदान), अनुराधा राजहंस (नव्या पिढीला रंगभूमीची आवड निर्माण करण्यात विशेष योगदान).
बालगंधर्व पुरस्कार (२०२१) :
शास्त्रीय गायिका डॉ. रेवा नातू (बालगंधर्व मुख्य पुरस्कार), रमा चोभे (व्हायोलिन शिक्षिका व कलाकार), समीर हंपी (नाट्य व्यवस्थापन), प्रसाद वनारसे (बहुआयामी नाट्यकर्मी), गणेश माळवदकर (पडद्यामागील कलाकार), प्रवीण वैद्य (बॉक्स थिएटर निर्मिती).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.