मुंबई - शपथविधी सोहळ्यानंतर मंत्री बाळा भेगडे यांचा सत्कार करताना मावळ तालुक्‍यातील भाजपचे पदाधिकारी.
मुंबई - शपथविधी सोहळ्यानंतर मंत्री बाळा भेगडे यांचा सत्कार करताना मावळ तालुक्‍यातील भाजपचे पदाधिकारी. 
पुणे

मावळच्या भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

सकाळ वृत्तसेवा

वडगाव मावळ - मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नावाची घोषणा झाली व तेथे हजर असलेल्या मावळसह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. ‘कोण आला रे कोण आला, मावळचा वाघ आला’, ‘महायुतीचा विजय असो’ अशा घोषणा दिल्या.   

गेल्या काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंत्रिमंडळाच्या विस्तारात मावळचे आमदार बाळा भेगडे यांची वर्णी लागणार असल्याचे शनिवारी (ता. १५) सायंकाळी निश्‍चित झाले व तालुक्‍यातील भाजपचे वातावरण बदलून गेले. कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. रविवारी सकाळी होणाऱ्या शपथविधीसाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबईची वाट धरली व राजभवनाच्या प्रांगणात झालेला शपथविधीचा शानदार सोहळा याची देही, याची डोळा अनुभवला.

मावळला तीस वर्षांनंतर संधी
बाळा भेगडे यांच्या रूपाने मावळ तालुक्‍याला मंत्रिपदाची दुसऱ्यांदा संधी प्राप्त झाली आहे. सुमारे तीस वर्षांपूर्वी माजी मंत्री मदन बाफना यांच्या रूपाने तालुक्‍याला मंत्रिपदाची प्रथमच संधी मिळाली होती.  बाफना यांना १९८९ ते १९९३ या कालावधीत मंत्रिपदाची संधी मिळाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT