पुणे

भाजप नगरसेविका शालन शिंदेला जामीन

CD

(बाळासाहेब सरवदे खून खटला)
------------------
सहा महिन्यांनंतर खुनातील संशयित आरोपी
भाजप नगरसेविका शालन शिंदेला जामीन
जबाबात विसंगती अन्‌ दोषारोपपत्रावर वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ६ : महापालिका निवडणुकीवेळी अर्ज भरण्याच्या कारणातून ‘मनसे’चा पदाधिकारी बाळासाहेब सरवदे याचा खून झाला होता. यात भाजप नगरसेविका शालन शंकर शिंदे (रा. जोशी गल्ली, सोलापूर) यांना अटक करण्यात आली. सहा महिन्यांनंतर आता त्यांची जामिनावर सुटका झाली. ॲड. रितेश थोबडे यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती मेहरूज पठाण यांनी शालन शिंदेंचा जामीन मंजूर केला.
मृत बाळासाहेबची चुलत वहिनी रेखा सरवदे यांनी महापालिका निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. त्याचवेळी परिसरातील शालन शंकर शिंदेंही अर्ज भरला होता. २ जानेवारीला दुपारी शालन शिंदे व अन्य संशयित आरोपींनी रेखा सरवदेंच्या घरासमोर येऊन ‘तुमचा अपक्ष अर्ज काढून घ्या, नाहीतर तुम्हाला बघून घेतो’ अशी धमकी दिली होती. त्यावेळी गल्लीत वाद नको म्हणून रेखा सरवदेंनी अर्ज काढून घेतला. त्यानंतर दुपारी पावणेपाचच्या सुमारास हनुमान मंदिराजवळील मयत बाळासाहेब, त्याचा भाऊ बाजीराव सरवदे, आदित्य सरवदे यांच्यासोबत शंकर शिंदेंची मुले व इतर लोकांनी त्यांच्यासोबत भांडण काढले. त्यांच्या हातामध्ये तलवारी, कोयते होते. शालन शिंदे व शारदा शिंदे यांनी बाळासाहेबाच्या डोळ्यात चटणी टाकली, इतरांनी हत्यारांनी वार करून त्याचा खून केल्याची फिर्याद मयताचा भाऊ बाजीराव पांडुरंग सरवदे याने जेलरोड पोलिसांत दिली होती. त्यावरून शालन शिंदेला अटक करण्यात आली. त्यानंतर जामिनासाठी केलेला त्यांचा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयात फेटाळला. नगरसेविका शालन यांनी ॲड. रितेश थोबडेंमार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
-------------
चौकट
वकिलांचा ‘असा’ होता युक्तिवाद
‘आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून दोषारूपपत्राचे अवलोकन केले, त्यावेळी सुरुवातीस अपघाती मृत्यू, तसेच नेत्र साक्षीदारांचे व फिर्यादीचा जबाब सुसंगत नाही’ असे मुद्दे ॲड. थोबडे यांनी मांडले. तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायाधीशांनी शालन शिंदेला एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना मंत्री किरेन रिजिजू दोनदा भेटले; सत्ताधारी-विरोधकांची कोंडी फुटणार का? विरोधी पक्षनेते काय म्हणाले?

Shivsena Supreme Court Hearing: शिंदेंना घाम फोडणारा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद, आज सुप्रीम कोर्टात काय घडलं?

Marathi News Live Updates : राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड

Rashi Bhavishya: कामिका एकादशीला महालक्ष्मी राजयोग; 'या' ३ राशींचं नशीब उजळणार? आयुष्यात येणार सुख-समृद्धी, ते पैशांसोबत नशिबाची साथ

PM Shri Innovation Visit: राज्यस्तरीय पाहणीमध्ये पीएम श्री गणोरी शाळेच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रधान सचिव रणजितसिंह देओल यांची दाद

SCROLL FOR NEXT