पाणंद रस्ते याेजनेमुळे शेतकरी समृद्धीकडे
प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे; कोळे मंडलाच्या शिबिरात दाखले वाटप
विंग, ता. १५ ः शेतकऱ्याला समृद्धीकडे नेण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतकरी पाणंद रस्ते योजना आणली आहे. या योजनेत कच्च्या रस्त्याचे पक्क्या रस्त्यात रूपांतर करून त्यावर शासनातर्फे निधी उपलब्ध केला जाईल. रस्त्याला विशिष्ट सांकेतांक देऊन त्याची नोंद सातबारावर आणली जाईल. या योजनेसह अन्य कल्याणकारी योजनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे यांनी केले.
येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व समाधान शिबिरात कोळे मंडलातील लाभार्थ्यांना मोफत दाखले वाटपप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद सदस्या शैलजा शिंदे अध्यक्षस्थानी होत्या. नायब तहसीलदार विश्वजितसिंह रजपूत, पुरवठा शाखेच्या साहिला नाईकवडे, मंडलाधिकारी जितेंद्र काळे, महसूल अधिकारी युवराज काटे, सरपंच दीपाली पाटील, माजी उपसरपंच सचिन पाचुपते, उपसरपंच संतोष कासार-पाटील, बाबूराव खबाले, भागवत कणसे, पोलीस पाटील रमेश खबाले, वैशाली शिंदे, भूमी अभिलेखच्या शबाना शिकलगार, दुय्यम निबंधक वैशाली शिंदे, फिरोज अंबेकरी, विद्या जंगम, कोळे सजातील सरपंच, उपसरपंच, शेतकरी व लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी विविध दाखल्यांचे पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मोफत वाटप झाले.
श्री. म्हेत्रे म्हणाले, ‘‘जुना व संगणकीकृत सातबारा तपासण्याचे काम शेतकऱ्यांचे आहे. त्यात काही त्रुटी असल्यास महिन्याच्या आत दुरुस्ती करून देण्याचे काम केले जाईल. विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी शेतकऱ्यांनी काढावा.’’
गावच्या विकास प्रकल्पासाठी गायरानच्या जमिनीची जागा ग्रामपंचायतीसाठी राखीव ठेवण्याची मागणी सचिन पाचुपते यांनी यावेळी केली. दीपाली बामणे यांनी सूत्रसंचालन केले. ग्राम महसूल अधिकारी जयेश शिरोडे यांनी प्रास्ताविक केले. स्वाती कदम यांनी आभार मानले.
B02231
विंग ः शिबिरात लाभार्थ्यांना दाखले वाटपप्रसंगी अतुल म्हेत्रे, शैलजा शिंदे, दीपाली पाटील, विश्वजितसिंह रजपूत, साहिला नाईकवडे, जितेंद्र काळे, सचिन पाचुपते आदी. (विलास खबाले ः सकाळ छायाचित्रसेवा)
..................................
--------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.