पुणे

लोकनेते बाळासाहेब देसाईंच्‍या स्मारकाचे लोकार्पण

CD

लोकनेते बाळासाहेब देसाईंच्‍या स्मारकाचे लोकार्पण

सातारा, ता. १६ : येथील पोवई नाका परिसरातील लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तैलचित्ररूपी स्मारकाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्राणालीद्वारे लोकार्पण झाले.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, सातारा पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, पालिकेचे उपाध्‍यक्ष ॲड. डी. जी. बनकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि सहकार क्षेत्राला दिलेली दिशा आहे. त्यांनी महाराष्ट्रात रस्ते पुलांचे जाळे निर्माण केले. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली व्हावीत, शिक्षण संस्थांचा विस्तार व्हावा आणि सामान्य कुटुंबातील मुलांना पुढे जाण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. लोकेनेते बाळासाहेब हे दूरदर्शी नेते होते, त्यांनी संसदीय लोकशाहीचा पाया रचला. त्यांचे स्मारक युवा पिढीला ऊर्जा, प्रेरणा देणारे ठरले, असाही विश्वास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी व्यक्त केला.
श्री. देसाई म्हणाले, ‘‘तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मारकाची उभारणी केली असून, हे स्मारक प्रत्येक नागरिकाला बाळासाहेबांच्या विचारांची आठवण करून देईल.’’
..............
42495
सातारा : स्‍मारक लोकार्पणप्रसंगी शंभूराज देसाई. शेजारी संतोष पाटील, याशनी नागराजन, निखिल पिंगळे व इतर मान्‍यवर. (प्रमोद इंगळे : सकाळ छायाचित्रसेवा).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT