पळसदेव, ता. ३० : पळसदेव (ता. इंदापूर) येथील बाळासाहेब कृष्णाजी गांधले (वय ७४) यांचे मंगळवारी (ता. ३०) ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शासकीय सेवेत असताना त्यांनी पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, ठाणे, सोलापूर जिल्ह्यामध्ये सेवा बजावली होती. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी व उपायुक्तपदापर्यंत त्यांना बढती मिळाली. साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले अधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.