उडतरेत स्काउट- गाइड वचनविधी
बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये फूड फेस्टिव्हलही उत्साहात
आनेवाडी, ता. ११ : उडतरे (ता. वाई) येथील बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये स्काउट-गाइड अंतर्गत वचनविधी व फूड फेस्टिव्हल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इंटिरिअर डिझायनर शीतल चव्हाण, अध्यक्षा सुनीता चव्हाण, तसेच वाई पंचायत समितीच्या सदस्या राणी पवार, सरपंच अर्चना पवार यांची उपस्थिती होती.
शीतल चव्हाण म्हणाल्या, ‘‘बाळासाहेब पवार विद्यालयामध्ये स्काउट-गाइडच्या माध्यमातून राबवले जाणारे वचनविधी व फूड फेस्टिव्हलसारखे उपक्रम इतर विद्यालयांनीही आदर्श म्हणून घ्यावेत.’’
या वेळी स्काउट-गाइड प्रमुख प्रकाश सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक केले. राणी पवार यांनी स्काउट-गाइड चळवळीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, मूल्यशिक्षण, स्वयंरोजगार आणि शिस्त या गुणांची जाणीव निर्माण करणे हा आहे. विद्यार्थ्यांनी या गुणांचे आत्मचिंतन करून संस्कृतीचे जतन करावे व भविष्यात त्याचा उपयोग करावा, असे सांगितले.
स्काउट-गाइडचे माजी राज्य सचिव कुसुम लोंढे, लीडर ट्रेनर अरविंद देशमुख व सुरेंद्र शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांना स्कार्फ प्रदान केले. मुख्याध्यापक दादासाहेब बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षिका रूपाली पवार यांनी परिचय करून दिला. यावेळी केंद्रप्रमुख गजानन वारगडे उपस्थित होते.
शीतल चव्हाण यांनी शाळेला ७० पुस्तके भेट देऊन वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले. फूड फेस्टिव्हलचे उद्घाटन अध्यक्षा सुनीता चव्हाण यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचे ५० स्टॉल उभारून विक्रीसाठी ठेवले होते.
ज्येष्ठ शिक्षिका त्रिवेणी पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. उपशिक्षिका सोनाली तनपुरे यांनी आभार मानले.
-----------------------------
02426
उडतरे : कार्यक्रमप्रसंगी सरस्वती पूजन करताना मान्यवर. (प्रशांत गुजर : सकाळ छायाचित्रसेवा)
-------------------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.