पुणे

शहिद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारणी ः पालकमंत्री विखे

CD

PNE26W19714
अहिल्यानगर ः पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
---------------
शहीद जवानांच्या मूळ गावी स्मारक उभारणी
राधाकृष्ण विखे ः विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान

अहिल्यानगर, ता. १६ ः देशाच्या रक्षणासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांचे केवळ स्मरण न राहता त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम राहावी, यासाठी त्यांच्या मूळ गावी स्मारके उभारण्याबाबत प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने उत्कृष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान व पुरस्कार सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार अमोल खताळ, उपमहापौर धनंजय जाधव, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी पोलिस कवायत मैदानावर हा सत्कार सोहळा आयोजित करण्याचे नियोजन होते. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, तसेच पुरस्कारार्थींना योग्य सन्मान मिळावा, या उद्देशाने कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला.

विखे पाटील म्हणाले की, उल्लेखनीय कार्यातून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःसह जिल्ह्याचाही लौकिक वाढवला आहे. प्रशासनातील सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जिल्ह्याचा नावलौकिक राज्यभर वाढला असून शासनाला या गुणवंत अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सार्थ अभिमान आहे. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिस दलाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. मनुष्यबळाची कमतरता असतानाही संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी सक्षमपणे पार पाडणाऱ्या पोलिस दलाच्या तत्परतेमुळे जिल्हा अधिक सुरक्षित राहिल्याचे त्यांनी नमूद केले.
----------------
कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांना ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार’, पोलिस पाटील दादासाहेब भोसले यांना ‘राज्यपाल विशेष उल्लेखनीय सेवा पुरस्कार’ तसेच ग्राम महसूल अधिकारी संगीता मगर यांचा गौरव करण्यात आला. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार’ सावित्रा गायकवाड आणि संगीता मालकर यांना प्रदान करण्यात आला. पोलिस व कृषी विभागात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. उत्कृष्ट सेवेबद्दल अपर पोलिस अधीक्षक वैभव मनोहर कलुबर्मे, मुख्तारखान पठाण, प्रल्हाद गिते, नितीन गांगुर्डे, मनोहर शेजवळ, अजय नगरे, संजय खंडागळे, गोविंद गोल्हार, राजू सद्रिक, राजेंद्र पाटोळे, सुनील नेहूल आणि प्रवीण साळुंखे यांना पोलिस महासंचालक पदकाने गौरविण्यात आले. सहायक कृषी अधिकारी किरण घोडके, उपकृषी अधिकारी विजय केदारे, मंडळ कृषी अधिकारी किरण उगले, तालुका कृषी अधिकारी अशोक वाळके आणि उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
------------

मदतीचा धनादेश
जिल्ह्यातील शहीद जवान शिपाई संदीप पांडुरंग गायकर यांच्या पत्नी दीपाली संदीप गायकर यांना राज्य शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांचा धनादेश पालकमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. कोरोना काळात मृत्यू झालेल्या ग्रामपंचायत शिपाई शिवाजी गुडेकर यांच्या वारसदार रवींद्र व राजेंद्र गुडेकर यांना ५० लाख रुपयांची मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT