पुणे

स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘फटकारे’ व्यंगचित्र स्पर्धा

CD

बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘फटकारे’
१५ नोव्हेंबरला हुतात्मा बागेत जिल्हास्तरीय व्यंगचित्र स्पर्धा; सुषमा अंधारे यांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १२ : शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सोलापुरात ‘फटकारे’ या जिल्हास्तरीय व्यंगचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर शहर शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने रविवारी (ता. १५) सकाळी ९.३० ते ११ या वेळेत हुतात्मा बाग, लकी चौक येथे ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. संपर्कनेत्या तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
सोलापुरातील व्यंगचित्रकार उन्मेश शहाणे आणि शेरशहा डोंगरी परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. चित्रकार नितीन खिलारे, आप्पासाहेब काडादी कला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड आणि व्यवसाय कला केंद्र कुचन प्रशालेच्या प्राचार्या प्रतिभा धोत्रे यांचीही उपस्थिती राहणार आहे.
स्पर्धेनंतर लगेचच बक्षीस वितरण होणार आहे. व्यंगचित्रकलेची आवड असलेल्या नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजक तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सोलापूर महानगरप्रमुख महेश धाराशिवकर यांनी केले. याप्रसंगी प्रताप चव्हाण, भीमाशंकर केंगनाळकर, तुषार अवताडे, सुरेश जगताप आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 4th ODI: ऋतुराज गायकवाड-रोहित शर्मा सलामीला, इशान पाचव्या स्थानावर; सामना संपताच वेगवान गोलंदाज वन डे टीम सोडून जाणार, नेमकं काय कारण?

Arvind Kejriwal Death Threat: अरविंद केजरीवाल यांना जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने मागितली ७ कोटींची खंडणी

Latest Marathi News Live Update : मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृह उभारणीच्या प्रस्तावावर आज स्थायी समितीत निर्णय होण्याची शक्यता

IPL Trade Records: हार्दिक पांड्या-अर्शदीप सिंग यांच्या ट्रेडने इतिहास घडवला; आयपीएलच्या इतिहासात सर्वात महागडा ट्रेड ठरला...

मुंबई विमानतळाची आंतरराष्ट्रीय सेवा कायम! ११ कंपन्यांची उड्डाणे नवी मुंबईतून, नवे टर्मिनल उभारणार; प्रशासनाचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT