केंद्रीय राज्यमंत्री अश्‍विनकुमार चौबे sakal
पुणे

बाळासाहेब ठाकेरेंच्याही आत्म्याला ठेच लागली असेल

केंद्रीय राज्यमंत्री अश्‍विनकुमार चौबे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्रात हनुमान चालिसा, जय श्रीराम म्हणाले तर अटक होत आहे. अशाप्रकारची स्थिती पाहून स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याही आत्म्याला ठेच पोहचली असेल, अशा शब्दात अन्न व पुरवठा, पर्यावरण, हवामानबदल केंद्रीय राज्यमंत्री आश्‍विनकुमार चौबे यांनी शिवसेनेवर टीका केली.

पुणे शहर भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिणीस राजेश पांडे, सरचिटणीस दीपक नागपुरे, राजेश येनपुरे उपस्थित होते.

उत्तर प्रदेशात भोंगे उतरवले जात आहेत, त्याचे स्वागत केले पाहिजे.सकाळी किंवा रात्री भोंग्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारचे जे नियम आहेत, त्याचे पालन झाले पाहिजे. बिहार मध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार आणि राजदचे नेते तेजस्वी यादव इफ्तार पार्टीत एकमेकांना गळ्याला पडले असतील तर त्यात गैर नाही. वेगवेगळ्या धर्माच्या सणात एकमेकांनी उत्साहाने भेटण्यास योग्यच आहे. पण त्यातून बिहार मध्ये कोणतीही राजकीय उलथापालथ होणार नाही, तेथे एनडीएचे सरकार सत्तेत राहील.

महाराष्ट्रात २० टक्के जमीन ही वन अच्छादित जमीन आहे, गेल्या तीन वर्षात वन्यप्राणी व माणसांवर हल्ले झाले आहेत, त्यामुळे जंगलामध्ये अशा घटना टाळण्यासाठी लक्ष दिले जात आहे. पश्चिम घाटातील वन वैभव टिकविण्यासोबत प्रयत्न आहेत, असे चौबे यांनी सांगितले.

साठेबाजांवर कारवाईचे आदेश

राज्यमंत्री आश्‍विनकुमार चौबे म्हणाले, मोदी सरकार महागाई कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. तेल ,डाळ यासह इतर अन्नधान्याची साठवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. युक्रेन व रशिया यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगावर परिणाम झाला आहे, पण हे युद्ध लांबल्यास महागाई आणखी वाढू नये यासाठी दीर्घकालीन धोरण ही ठरविण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूवरील किमती वाढू नयेत यासाठी आमचे प्रयत्न आहेत. ‘वन नेशन, वन रेशन योजनेनुसार देशातील ३० लाख स्थलांतरित नागरिकांना मोफत अन्नधान्य मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

SCROLL FOR NEXT