Balbharati sakal
पुणे

नव्या तंत्रज्ञानाच्या साथीने बालभारती बदलत आहे; प्रा. वर्षा गायकवाड

बालभारतीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या.

सकाळ वृत्तसेवा

बालभारतीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या.

पुणे - बालभारतीचे (Balbharati) आजवरचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रातील (Education Field) योगदान अत्यंत मोलाचे असून, बदलत्या काळासोबत नव्या तंत्रज्ञानाच्या (New Technology) साथीने बालभारतीही बदलत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा बालभारतीच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केले.

बालभारतीच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ऑनलाईन संबोधित करताना त्या बोलत होत्या. यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, भारतीय वन सेवेतील वरिष्ठ अधिकारी रंगनाथ नाईकडे, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आदी उपस्थित होते.

प्रा. गायकवाड म्हणाल्या, ‘नवी पिढी ही अधिक गतिमान आणि तंत्रस्नेही आहे. कोरोना काळाने या क्षेत्रापुढे देखील विविध आव्हान उभे केले आहेत. या अनुषंगाने मुलांच्या हातात अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पुस्तके देण्यासाठी बालभारती प्रयत्नशील आहे. पुस्तकांच्या आशय आणि रचनेत मोठ्या प्रमाणात बदल केले जात आहेत. पुढील शैक्षणिक वर्षांपासून येणारी एकात्मिक आणि द्विभाषिक पुस्तके हा त्याचाच एक भाग आहे. राज्यातील शिक्षण तज्ज्ञांच्या साहाय्याने येत्या काळात अभ्यासक्रम आणि पुस्तकाच्या क्षेत्रात विविध प्रयोग केले जाणार आहेत.’’

नाईकडे म्हणाले, ‘आजवर अनेक पिढ्या घडविण्यात बालभारतीचा मोठा वाटा राहिला आहे. लहानपणी बालभारतीशी जुळलेले भावबंध मोठे झालो तरी कायम राहतात. बालभारतीचे काम हे एखाद्या दीपस्तंभासारखे राहिले आहे. मागील पंचावन्न वर्षांपासून दर्जेदार पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी बालभारतीचा ऋणी आहे.’ नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मातृभाषेतून देण्यात बालभारतीची महत्त्वाची भूमिका असणार आहे, असा विश्वास सोळंकी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: बिंदुसरेत आढळला चिमुरडीचा मृतदेह; बीड शहरामधील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

Gadchiroli News: पावसात धानाचे पुंजणे वाचवताना १७ वर्षीय मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू; कोरची तालुक्यातील शेतातील दुर्घटना

Latest Marathi News Live Update : नाशकात ट्रकच्या धडकेत पादचाऱ्यांचा मृत्यू

Vote Theft: निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करा; मनसेची पोलीस आयुक्तांकडे मागणी

औरंगाबाद नाही, आता छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक; अधिकृत बदल, नवा कोडही जारी

SCROLL FOR NEXT