पुणे

विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

CD

पुणे, ता. २६ : पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात घडलेल्या विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या उरुळी कांचन पोलिसांनी थरारकपणे पाठलाग करून अटक केली.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीच्या दारूच्या सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत १० ते १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, या रॅकेटमध्ये आणखी सुमारे २० जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांचा शोध सीआयडीची पथके घेत आहेत. हा प्रकार २६ ते २८ मे या कालावधीत दापोडी तसेच हडपसर परिसरात घडला होता.
तपासात आरोपींकडून जप्त केलेले मोबाइल फोन आणि इतर तांत्रिक पुराव्यांची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळू लोंढे गुन्ह्यानंतर फरार झाला होता. सीआयडी, तसेच पुणे ग्रामीण पोलिस आणि पुणे पोलिस त्याचा शोध घेत होते. मात्र, तो मे महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. उरुळी कांचन पोलिसांना बाळू लोंढे हा लोणी काळभोर तसेच उरुळी कांचन या भागात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, पोलिस त्याचा गुप्त पद्धतीने शोध घेत होते.

अन्य आरोपींचा शोध घेतला जाणार
या गुन्ह्यात आर्यन संजीव धोत्रे (वय २४) आणि कल्पेश अशोक अग्रवाल (वय २९) यांना मंगळवारी अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना एक सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळू लोंढे याची या गुन्ह्यातील भूमिका, दारूचा पुरवठा, संबंधित व्यक्ती तसेच या गुन्ह्याची संपूर्ण साखळी याबाबत पोलिसांकडून चौकशी केली जाणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे या प्रकरणातील अन्य आरोपी आणि संबंधितांचे धागेदोरे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

ओळख लपविण्यासाठी बदलला पेहराव
पोलिसांपासून वाचण्यासाठी बाळू लोंढे याने फरारी काळात आपला पेहराव बदलला होता. नेहमी दाढी-मिशा वाढवून तसेच कपाळावर टिळा लावून वावरणारा बाळू आता दाढी-मिशा काढून आणि मळकट कपडे घालून वावरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT