Bamboo Farming Workshop sakal
पुणे

Bamboo Farming Workshop : बांबू पीक ‘बायोमास’चा मुख्य स्रोत : पाशा पटेल

‘एसआयआयएलसी’तर्फे आयोजित बांबू शेती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.... ‘‘जागतिक तापमानवाढ नियंत्रित करायची असेल तर दगडी कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यांचा वापर हळूहळू कमी करून बायोमासचा इंधन म्हणून उपयोग करणे आवश्यक आहे. बांबू हे अतिशीघ्र वाढणारे आणि बहुउपयोगी पीक बायोमासचा मुख्य स्रोत होऊ शकते,’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘जागतिक तापमानवाढ नियंत्रित करायची असेल तर दगडी कोळसा, पेट्रोल आणि डिझेल यांचा वापर हळूहळू कमी करून बायोमासचा इंधन म्हणून उपयोग करणे आवश्यक आहे. बांबू हे अतिशीघ्र वाढणारे आणि बहुउपयोगी पीक बायोमासचा मुख्य स्रोत होऊ शकते,’’ असा सल्ला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री पर्यावरण टास्क फोर्सचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिला.

‘सकाळ माध्यम समूहा’च्या एसआयआयएलसी कौशल्य शिक्षण संस्थेतर्फे ‘पर्यावरण रक्षणासाठी व्यावसायिक बांबू शेतीचे महत्त्व, मार्केट, व्यवसाय संधी व मूल्यवर्धन’ विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन शनिवारी केले होते. कार्यशाळेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पटेल म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने वर्षाला पाच टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सरकार बांबू पिकाला हेक्टरी सात लाखांचे अनुदानसुद्धा देते. बांबू रोप संशोधनासाठी सरकारने १०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. म्हणून बांबू शेतीकडे वळणे आवश्यक आहे.’’

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांबू पिकाची यशोगाथा, लागवडीतील संधी, विविध जाती, मूल्यवर्धन व शेती व्यवस्थापनाबाबत कोकण बांबू आणि केन डेव्हलपमेंट सेंटरचे (कुडाळ) संचालक संजीव करपे यांनी मार्गदर्शन केले. पुढील पाच ते १० वर्षांतील बांबू मार्केटची स्थिती व उपलब्ध बाजारपेठ याबद्दल नवी दिल्लीतील फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टरचे संचालक मुकेश गुलाटी यांनी माहिती दिली. बांबूचा बांधकाम क्षेत्रातील वाढता वापर आणि विविध उत्पादनांबद्दल ज्युरिअन सस्टेनेबिलटी कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेसचे संचालक कृणाल नेगांधी यांनी माहिती दिली.

मुथा उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल मुथा यांनी त्रिपुरा राज्यातील बांबूची यशोगाथा सांगितली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्थापन केलेल्या बांबू फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पेश गंभिरे यांची विशेष उपस्थिती होती. ‘एसआयआयएलसीचे’ अमोल बिरारी व अमित मांजरे यांनी कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

देशातील सध्याचा बांबू उद्योग साडेबारा हजार कोटींचा असून यात पूर्णवेळ काम करणाऱ्यांची संख्या १० लाखांच्या आसपास आहे. सध्याचा वेग पाहता देश येत्या १० वर्षांत बांबू उद्योगात ५६ हजार कोटींपर्यंत मजल मारेल. यात २७ लाख लोकांना पूर्णवेळ सामवून घेईल, अशी स्थिती आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी देशाला बांबू शेती आणि उद्योगात वेग वाढवावा लागेल.

— मुकेश गुलाटी,

फाउंडेशन फॉर एमएसएमई क्लस्टर, नवी दिल्ली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

माधुरी दीक्षितने डॉक्टर असलेल्या नेनेंसोबत लग्न का केलं? सोनाली बेंद्रेसमोर सांगितलं खरं कारण; म्हणाली- मी अशा माणसाशी लग्न केलंत जो...

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील आंदोलनांसाठी जंतरमंतर बंद; निदर्शनांसाठी तीन नवी ठिकाणे निश्चित

Panvel News: पनवेलचा 'ताप' वाढला! धोक्याची घंटा; पर्यावरण अहवालात दीड अंशाच्या वृद्धीची नोंद

SCROLL FOR NEXT