Krupali-Nikam
Krupali-Nikam 
पुणे

#Banmanja कृपालीच्या स्वप्नांची अधुरी कहाणी

आनन शिंपी

चाळीसगाव (जि. जळगाव) - लहानपणापासून मनातील एमडी डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न...पितृ अामावास्येनंतर हात पिवळे करण्याचा आई-वडिलांच्या मनातील निर्धार...मैत्रिणीला ‘उद्या भेटू’ असे दिलेले आश्‍वासन...हे सारे सोडून ती निघून गेली कायमची. तीही एका अपघाताने. 

डॉक्‍टर बनण्यासाठी पुण्यात आलेली चाळीसगावची कृपाली पतंगाच्या मांजाचा बळी ठरली. लहानपणी खेळताना पाहिलेली अन्‌ जिद्दीने डॉक्‍टर झालेल्या चाळीसगावच्या या कन्येच्या अकाली मृत्यूने पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा अद्याप ओल्याच आहेत. त्या तिच्या केवळ गोड आठवणींनी आणि तिच्या अधुऱ्या राहिलेल्या स्वप्नांमुळे. 

मूळची धामणगावमधील असलेली डॉ. कृपालीचा भोसरीतील उड्डाण पुलावर पतंगाच्या माजांने गळा चिरून मृत्यू झाला. तिच्यावर चाळीसगावात अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन दिवस उलटून गेले तरी चाळीसगाव सुन्न आहे. ग. स. सोसायटीचे माजी शाखाधिकारी कल्याणराव निकम व प्राथमिक शिक्षिका पौर्णिमा निकम यांना कृपाली व प्रतीक ही दोन मुले. कृपालीचे बारावीपर्यंतचे शिक्षण चाळीसगावात झाले. तिने बी. एड. करून शिक्षिका व्हावे, अशी आई-वडिलांची इच्छा; पण कृपालीला डॉक्‍टरच व्हायची इच्छा होती. बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर संगमनेरच्या वैद्यकीय महाविद्यालयात तिला बी.ए.एम.एस.साठी प्रवेश मिळाला. ही पदवी तिने संपादित केलीच; पण प्रसूतिशास्त्र आणि बाल आरोग्य या विषयात पारंगत होण्याची इच्छा होती. त्यामुळे ती खास या प्रशिक्षणासाठी पुणे गाठले. विश्रांतवाडी भागात गेल्या सहा महिन्यांपूर्वीच ती राहात होती. तिचा लहान भाऊ प्रतीक हाही पुण्यातच असून, तो बी. ई. सिव्हिलच्या शेवटच्या वर्षांत आहे.

‘तिने’ आश्‍वासन पाळलेच नाही...
कृपाली प्रसूतिशास्त्र व बाल आरोग्य विषयाचे प्रशिक्षण करून नंतर एका खासगी दवाखान्यात प्रॅक्‍टिस करायची. ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला, त्या दिवशी तिने आपल्या मैत्रिणीला रस्त्यात तिच्या घराजवळ सोडले आणि ‘उद्या भेटू’ असा निरोप घेऊन ती भोसरीकडे निघाली. मात्र, रस्त्यातच पतंगाच्या मांजाने तिचा बळी घेतला. मैत्रिणीचे उद्या भेटण्याचे आश्‍वासन तिला पाळता आले नाही.

‘तिचे’ हात पिवळे झालेच नाहीत...
योग्य वेळी अनुरूप स्थळ पाहून विवाह करण्याचे सर्व आई वडिलांचे स्वप्न असते. तसे निकम कुटुंबीयांचेही होते. कृपाली डॉक्‍टर झाल्याने आई-वडील तिच्या यशाबद्दल समाधानी होते. आता पितृ पंधरवडा संपला की तिचे हात पिवळे करण्याचा विचार त्यांच्या मनात निश्‍चित झाला होता. त्यानुसार त्यांनी अनुरूप स्थळ पाहण्यासाठी सुरवात केली होती; परंतु ते नियतीला मान्य नसावे. आई-वडिलांचे हे स्वप्न अखेर अधुरे राहिले.

‘एमडी’ करायचे राहून गेले
कृपालीला एमडी पदवी पूर्ण करायची होती. त्यासाठी तिने ऑनलाइन अर्जही केला होता. घरात तिला सर्व ‘सोनी’ या टोपण नावानेच हाका मारायचे. ‘आमच्या सोनीला एमडी करायचे होते’, असे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. एमडी झाल्यानंतर तिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन वैद्यकीय क्षेत्रात अधिकारीदेखील व्हायचे होते. कुटुंबीयांच्या या आठवणींचे वादळ अजूनही शमले नाही.

राज्य सरकारने मांजावर बंदी घातलेली असतानाही त्याचा सर्रास वापर होतो तरी कसा? दरवर्षी माझ्या कृपालीसारख्या अनेक मुला-मुलींचे मृत्यू यामुळे होतात. आमची कृपाली तर आता परत येणार नाही. मात्र, पुन्हा दुसरी कृपाली अशी जाऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना झाल्या पाहिजेत.
- कल्याणराव निकम, कृपालीचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

SCROLL FOR NEXT