Pune Municipal Corporation sakal
पुणे

Pune News : निष्काळजीपणे इमारत पाडल्याने बांधकामावर घातली बंदी

कोथरूडच्या शिवतीर्थनगरमध्ये जुनी इमारत पाडताना कोणतीही काळजी न घेता थेट आख्खी इमारत पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आला समोर.

सकाळ वृत्तसेवा

पुणे/कोथरूड - कोथरूडच्या शिवतीर्थनगरमध्ये जुनी इमारत पाडताना कोणतीही काळजी न घेता थेट आख्खी इमारत पाडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बांधकाम विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला नोटीस बजावून काम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

शिवतीर्थनगर मध्ये एका सोसायटीची जुनी इमारत पाडून तेथे नवीन इमारत बांधली जाणार आहे. याचे काम घेतलेल्या बांधकाम व्यावसायिकाने ठेकेदारामार्फत ही जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू केले होते. अशावेळी इमारत पाडताना वरच्या भागापासून पाडत येणे आवश्‍यक आहे. पण ही इमारत थेट खालून पाडल्याने मोठा भाग कोसळला.

त्यामुळे मोठा आवाज होत मोठी धुळ उडाली, दगड, खडे उडाले. त्यावेळी रस्त्यावर उभे असलेले नागरिक जीव वाचविण्यासाठी घाबरून पळाले. या धुळीच्या लोटामध्ये अडकलेली दुचाकीस्वार महिला सुदैवाने बचावली. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी प्रत्यक्षदर्शींमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली. याप्रकरणी आज महापालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित बांधकाम व्यावसायिकास पुढील आदेशापर्यंत बांधकाम थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

स्थानिक नागरिक श्रीपाद चिकणे म्हणाले,र'‘इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी ती खाली करण्यात आली होती. ठेकेदाराकडून इमारत पाडण्याचे काम सुरू असताना इमारतीचा मोठा भाग पडला. सगळा राडारोडा रस्त्यावर आला होता तो आम्ही बाजूला केला.

सुनील मराठे म्हणाले की, ‘रस्त्यावर वर्दळ असताना अशी कामे करताना खबरदारी घेणे अपेक्षित होते. पण येते कोणतेही नियोजन नव्हते.

कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक हेमंत पाटील यांनी याप्रकरणात आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नसल्याचे सांगितले.

शिवतीर्थ नगरमधील इमारतीचे पुर्नबांधकामासाठी काम सुरू असताना इमारत पडल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संबंधित बांधकाम व्यावसायिकास काम थांबविण्याचे आदेश देण्यात आली आहेत. याप्रकरणी कारवाई केली जाईल.’

- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT