Ban on premises of Savitribai Phule Pune University police crime marathi news sakal
पुणे

Pune SPPU : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात जमावबंदी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. सात ते २१ नोव्हेंबर दरम्यान जमावबंदी लागू करण्याचा आदेश देण्यात आला असून, आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी संघटनांमध्ये मारहाणीच्या घटना घडल्या होत्या. त्या पार्श्‍वभूमिवर सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हे आदेश लागू केले आहेत. आदेशातून विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पोलिस अधिकारी, सुरक्षा अधिकारी यांना वगळण्यात आले आहे.

विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार, राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून विद्यार्थ्यांना मारहाण अशा घटनांमुळे विद्यापीठात तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पुणे पोलिसांना पत्र दिले होते. त्यानंतर जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांत विद्यापीठाच्या बाहेरील व्यक्ती, संघटना यांनी विद्यापीठाची किंवा पोलिसांची पूर्वपरवानगी न घेता निदर्शने, आंदोलने, मोर्चा आयोजित करून, चिथावणी देणारी भाषणे, घोषणांद्वारे शांततेचा भंग करून शैक्षणिक वातावरण बाधित करण्याचा प्रयत्न केला आहे. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पूरक असे सौहार्दपूर्ण, शांततामय वातावरणाची आवश्यकता असल्याने विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात निर्बंध घालणे आवश्‍यक असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई

फौजदारी संहिता प्रक्रिया १९७३च्या कलम १४४ नुसार विद्यापीठ आणि सभोवतालच्या शंभर मीटर परिसरात विद्यार्थ्यांशिवाय इतर व्यक्तींना एकत्र येण्यास, विद्यापीठात प्रवेश करण्यास प्रतिबंध, विद्यापीठ परिसरात दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT