पुणे - एकीकडे शाळांकडून शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सक्ती केली जात आहे. दुसरीकडे पुस्तक, गणवेशाचेही पैसे भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावला जात आहे. या पार्श्वभूमीवर शाळांनी पुस्तक, गणवेश व इतर साहित्याची विक्री करू नये, असे आदेश शिक्षण अधिकाऱ्यांनी काढले आहेत.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
लॉकडाउनमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाने पालक मेटाकुटीला आले आहेत. शाळांनी पुस्तके घ्या, गणवेश घ्या, असे आदेश देत पैसे भरायला सांगितले आहे. तसेच शैक्षणिक शुल्काचा पहिला हप्ता भरल्यानंतरच प्रवेश निश्चित केला जाईल, असेही बजावले जात आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अनेक शाळांमध्ये नियमांचे उल्लंघन करून पालकांना पुस्तक घेण्यासाठी बोलावले जात आहे. तसेच गणवेशासाठी मापही देण्यास सांगितले जात आहे. याविरोधात मनसेचे प्रदेश सदस्य शैलेश विटकर यांनी शिक्षण अधिकारी (माध्यमिक) गणपत मोरे यांच्याकडे शाळांची तक्रार केली होती. त्यानुसार, त्यांनी आदेश काढले आहेत.
पुण्यातील विनाअनुदानित शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता पुस्तकांची विक्री केली जात आहे, अशा तक्रारी कार्यालयाकडे आल्या आहेत. शाळांना पुस्तके, गणवेश व इतर साहित्य विक्री करता येणार नाही. कोरोनामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी शाळांनी घेतली पाहिजे, असे आदेश काढले आहेत.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
शाळा कधी सुरू होणार? याची माहिती नाही. पण, गणवेश, पुस्तकांचा खर्च पालकांना करावा लागत आहे. शाळांनी पालकांची पिळवणूक थांबवली पाहिजे. तसेच शाळेत बोलावले जात असल्याने कोरोनाचा धोका ही निर्माण झाला आहे. याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष करू नये.
- शैलेश विटकर, प्रदेश सदस्य, मनसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.