पुणे

षडयंत्र हाणून पाडण्यासाठी केळी उत्पादक व व्यावसायिकांची सोमवारी टेंभुर्णीत बैठक - शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांची माहिती

CD

संजय कोकाटे
TMB26B03764

केळी उत्पादक, व्यावसायिकांची सोमवारी टेंभुर्णीत बैठक
शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांची माहिती

टेंभुर्णी, ता. ३ : सोलापूर जिल्ह्यातील केळीची आखाती देशात निर्यात वाढलेली असून, केळी पिकातून शेतकऱ्यांना ही चांगले उत्पादन मिळत आहे. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील केळी लागवड कमी व्हावी म्हणून काही कारखानदार जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. हे षडःयंत्र हाणून पाडण्यासाठी सोमवारी (ता.५) दुपारी बारा वाजता टेंभुर्णीतील पुष्पक मंगल कार्यालयात केळी उत्पादक शेतकरी, केळी व्हेंडर व केळी संबंधित उद्योजक या सर्वांची बैठक आयोजित केल्याची माहिती शिवसेनेचे माढा लोकसभेचे संपर्कप्रमुख संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अतिरिक्त उत्पादन वाढले नसताना केळीचे जाणून-बुजून दर पाडले जात आहेत. शेतकऱ्यांना केळी, डाळिंब, पेरू आदी फळबाग पिकामुळे सुबत्ता आली आहे. ऊस लागवड कमी होऊ लागल्यामुळे राज्यातील कारखानदार पुढारी लॉबी पुढे सरसावली आहे. ही लॉबी शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर केळी रोपे मिळू नयेत. जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज वाढू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. केळीची रोपे आंध्र प्रदेशातून घेऊन तीस रुपये दराने शेतकऱ्यांना विकली जात आहेत. असंघटित शेतकरी वर्गाचा गैरफायदा घेतला जातआहे. दर पडल्याने शेतकरी पोटच्या पोराप्रमाणे जोपासलेले केळी पीक रोटाव्हेंटरने काढून टाकत आहेत.
शेतकरी वर्गात एकजूट नसल्याने अनेक व्यापारी कोट्यवधींची रक्कम बुडवून पसार होत आहेत. भविष्यात असे धोके होऊ नयेत. केळीस हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचे बोर्ड तयार करून इकॉनॉमी कशी मजबूत होईल याकडे लक्ष ठेवले जाईल. परकीय चलन मिळवून देणारा व्यवसाय कोसळतोय तो काढण्याचा प्रयत्न होत असल्याने चळवळ सुरू करीत असल्याचे श्री.कोकाटे यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत अकोले खुर्द येथील संतोष पाटील, प्रहार संघटनेचे संपर्कप्रमुख अमोल जगदाळे, सतीश काळे, बालाजी पाटील हे केळी व्हेन्डर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Session: भास्कर जाधव आणि कल्याणशेट्टींमध्ये वाद, विधानसभेतच एकमेकांचा बाप काढला; धक्कादायक Video समोर

रामराव वडकुते कोण? राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्याला राज्यसभेची उमेदवारी

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधूंमध्ये पुन्हा एकदा वितुष्ठता, राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतल्याने उद्धव ठाकरेंचा अबोला

'सावळ्याची जणू सावली' मध्ये होणार नव्या अभिनेत्रीची एंट्री; सावलीसमोर येणं आणखी एक संकट

Maharashtra Export: युद्धामुळे महाराष्ट्राला फटका! जेएनपीए बंदरात सुमारे 2 हजार कंटेनर अडकले, निर्यातीवर परिणाम

SCROLL FOR NEXT