पुणे

सोलापूर- केळीला ३० रुपये ६० पैसे प्रतिकिलो हमीभाव द्या

CD

पान ५
-------------------
केळीला ३० रुपये ६० पैसे
प्रति किलो हमीभाव द्या

केळी परिषदेचे अध्यक्ष किरण चव्हाण, पंढरपुरात ‘चौथी राष्ट्रीय केळी परिषद’

अॅग्रोवन वृत्तसेवा
पंढरपूर : केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळवून देण्याच्या मागणीसाठी पंढरपूर येथे ‘चौथी राष्ट्रीय केळी परिषद’ झाली. या परिषदेत केळीला ३० रुपये ६० पैसे प्रति किलो दर (हमीभाव) मिळावा, अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी शासनाकडे केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतुल माने पाटील होते. त्या वेळी चव्हाण बोलत होते. मध्य प्रदेश केळी परिषदेचे अध्यक्ष हेमंत पाटील उपस्थित होते. केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी निगडित असलेला हमीभाव, केळीचा शालेय पोषण आहारामध्ये समावेश करणे, पीकविमा आणि निर्यात धोरण या प्रमुख मागण्यांसाठी महासंघ गेली चार वर्षे पाठपुरावा करत आहे. मात्र, शासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. विधानसभेत व संसदेत केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्रतेने आवाज उठवावा, असे आवाहन चव्हाण यांनी केले. तसेच, महाराष्ट्रात कमीत कमी १० केळीचे बाय-प्रॉडक्ट (उप-उत्पादने) कारखाने उभे करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
पाटील म्हणाले, की वादळ, वारे, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मध्य प्रदेश सरकार हेक्टरी ३ लाख रुपये अनुदान देते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.
केळी विक्री करताना व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूक आणि दलालांची मनमानी यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाने आणि प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या परिषदेमध्ये रोपलागवडीपासून ते हार्वेस्टिंगपर्यंत आणि विक्री व्यवस्थेवर सखोल चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन कोरडे, किशोर चौधरी, कन्हैया महाजन, डॉ. रणजित चिकने, उत्तमराव पाटील यांनी परिश्रम घेतले.


‘केळी रत्न’ व ‘मोसंबी रत्न’
पुरस्काराने सन्मान
शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा या वेळी विशेष सत्कार करण्यात आला. एकरी ३० टन उत्पादन घेणाऱ्या महाराष्ट्रातील २९ शेतकऱ्यांना ‘केळी रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पपई पिकात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ३ शेतकऱ्यांना आणि मोसंबी पिकातील १ शेतकऱ्याला ‘मोसंबी रत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

टीम इंडियाचे 'Fantastic Four'! आयसीसीची मोठी घोषणा, जगात भारताच्या ८ खेळाडूंचा डंका

Sant Balumama Temple Land Scam : आदमापुरातील संत बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात अतिग्रेच्या माजी सरपंचाला अटक; सात दिवसांची पोलिस कोठडी

अनेकांनी पैसे बुडवले, पत्नीमुळे तरला! 'हे' काम करते 'दृश्यम ३'मधल्या गायतोंडेची बायको; दिसायलाही आहे इतकी सुंदर

Latest Marathi News Live Update : विरोधी पक्षनेते राहुल गांधी विरोधी पक्षाच्या खासदारांसोबतच्या स्नेहभोजनास उपस्थित

Bharadi Death News: भराडीत दारूच्या दुकानासमोर तरुणाचा मृतदेह; शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

SCROLL FOR NEXT